Suniel Shetty KL Rahul, IPL 2023 & WTC 2023 Final: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलच्या दुखापतीमुळे संघाला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुल आता आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधूनही बाहेर आहे. अशा परिस्थितीत तो लवकर बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत. केएल राहुलचे सासरे म्हणजेच बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनीही तो लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी जावईबापूंवर होणाऱ्या टीकेला सासरेबुवांनी प्रेमळ भाषेत पण रोखठोक उत्तर दिले.
केएल राहुलला दुखापत झाली तेव्हा अथिया शेट्टी स्टेडियममध्ये उपस्थित होती. पतीची अशी अवस्था पाहून ती खूप घाबरली. आता केएल राहुलचे सासरे सुनील शेट्टी यांनी अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तो लढाऊ वृत्तीचा असून लवकरच मैदानावर परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची माहिती राहुलने त्याच्या चाहत्यांना आधीच दिली आहे. अनेक खेळाडू जखमी असून त्यात बुमराह, अय्यर आणि आता राहुल सामील झाले आहेत. पण तो लवकरच बरा होऊन दमदार पुनरागमन करेल, असे सुनील शेट्टी म्हणाला.
सुनील शेट्टीने सांगितले की, उद्या केएल राहुलवर शस्त्रक्रिया होणार आहे. तो लवकर बरे होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. यासोबतच सुनील शेट्टी म्हणाला की, भारतीय क्रिकेट संघात एकापेक्षा एक महान खेळाडू आहेत. प्रत्येकजण चांगले करतो. मला वाटते की यावेळी डब्ल्यूटीसीमध्ये खेळण्याची संधी दुसऱ्या कोणाला तरी मिळणार आहे ही देखील गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत आणि होत असतात त्यामुळे त्याकडे सहानुभूतीने पाहायला हवे.
आयपीएल सामन्यादरम्यान केएल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती. खुद्द केएल राहुलने ही पोस्ट शेअर करून त्याच्या चाहत्यांना माहिती दिली की तो आता आयपीएलमध्ये भाग घेणार नाही आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमधूनही तो बाहेर पडला आहे.
1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना खेळताना क्षेत्ररक्षणादरम्यान राहुलला दुखापत झाली होती. तो संपूर्ण सामन्यात बसून होता आणि शेवटचा फलंदाज म्हणून फलंदाजीसाठी आला होता. मात्र, 10 मिनिटे खेळपट्टीवर राहूनही तो एकही धाव करू शकला नाही आणि संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही.