भारतीय संघात सर्वकाही आलबेल असल्याचा कितीही दावा केला जात असला तरी तसं नक्कीच नाही. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियातील भेदभाव समोर आणला आहे. आर अश्विन ( R Ashwin) आणि टी नटराजन ( T Natarajan) या गोलंदाजांना संघात दुटप्पी वागणुक मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इथे खेळाडूंनुसार नियम बदलतात, असेही ते म्हणाले.
सुनील गावस्कर यांनी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यावरही निशाणा साधला. पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी विराट सुट्टीवर गेला आहे आणि त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी परतण्याची परवानगी मिळाली. तेच दुसरीकडे टी नटराजन याला त्याच्या मुलीला अजूनही भेटता आलेले नाही. इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफ दरम्यान त्याच्या घरी ही गोडबातमी आली होती.
गावस्कर म्हणाले,''कसोटीत ३५० विकेट्स नवावर असलेला अश्विन संघात असावा असे देशातील क्रिकेट चाहत्यांना वाटते. पण, एका सामन्यातील खराब कामगिरीनंतर त्याला पुढील सामन्यात बाकावर बसवले जाते. पण, नावाजलेल्या फलंदाजाबाबत असे घडत नाही. अश्विनसाठी दुसरा नियम लावला जातो.'' टी नटराजनला केवळ नेट गोलंदाज म्हणून केवळ ऑस्ट्रेलियात ठेवले गेले आहे, यावरही गावस्करांनी लक्ष वेधले.
दुसऱ्या कसोटीसाठी रवींद्र जडेजा तंदुरूस्तपृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत अपयशी ठरल्यानंतर शुबमन गिलला संधी मिळणे अपेक्षित आहे. मयांक अग्रवालसह तो सलामीला खेळण्याची शक्यता अधिक आहे. मधल्या फळीत विराट कोहलीच्या जागी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे. त्याच्यासाथीला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे ही जोडी... हनुमा विहारीनेही निराश केले आहे आणि त्यामुळे त्याच्याजागी रवींद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडू खेळवण्याचा विचार कर्णधार रहाणे नक्की करेल. जडेजा दुसऱ्या कसोटीसाठी फिट आहे. वृद्धीमान सहाच्या जागी रिषभचा पर्याय आहे. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळेल. संघानं पंत आणि सहा या दोघांनाही खेळवण्याचे ठरवल्यास यष्टिंमागे सहाच दिसेल, तर जडेजाला संधी मिळणे अवघड होऊन बसेल.
दुसऱ्या कसोटीतील Playing XI - शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, वृद्धीमान सहा/रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज.