Join us  

Sunil Gavaskar expresses regret: "माझी वेळ चुकली"; Shane Warne बद्दलच्या वादग्रस्त विधानांबद्दल अखेर सुनील गावसकर यांची प्रामाणिक कबुली; विधानाबद्दल व्यक्त केली दिलगिरी

सुनील गावसकर यांनी व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केली दिलगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 9:05 AM

Open in App

Sunil Gavaskar expresses regret on Shane Warne Comment: ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याचं शुक्रवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. वयाच्या ५२व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या अकाली निधनाचा धक्का साऱ्यांनाच बसला. वॉर्नबद्दल एका वाहिनीवर एक शो घेण्यात आला आणि त्यात त्याच्या बद्दलच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे, या शो दरम्यान गावसकर यांनी काही विधानं केली जी वादग्रस्त ठरल्याचं दिसून आलं. 'शेन वॉर्न हा किंग साईज लाईफ जगायचा आणि त्याचं अशा अंदाजात लाईफ एन्जॉय करणं त्याच्या हृदयाला झेपलं नाही' असं एक विधान त्यांनी केलं. तर 'शेन वॉर्नपेक्षा मुथय्या मुरलीधरन हा जास्त चांगला स्पिनर होता. शेन वॉर्नचे भारतातील आकडेवारी पाहून ते समजतं', असंही एक वक्तव्य त्यांनी केलं होतं. या दोन विधानांवरून गावसकरांवर जोरदार टीका करण्यात आली. या टीकेनंतर अखेर गावसकरांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली.

"गेल्या आठवड्यात आपण रॉडनी मार्श आणि शेन वॉर्न ही क्रिकेट विश्वातील दोन बडी व्यक्तिमत्व गमावली. ते दोघेही अनेकांचे आदर्श होते. मला एका कार्यक्रमात विचारण्यात आले की शेन वॉर्न हा सर्वोत्तम स्पिनर होता का? त्यावर मी अतिशय प्रामाणिक मत मांडलं. पण तो प्रश्न विचारण्याची ती वेळ नव्हती. तसेच मी देखील त्यावेळी त्याचं उत्तर द्यायला नको होतं. कारण ती वेळी तुलना करण्याची नव्हती. शेन वॉर्न हा महान खेळाडूंपैकी एक होता. तर रॉड मार्श हे महान विकेटकिपरपैकी एक होते. ईश्वर त्या दोघांच्याही आत्म्यास शांती देवो", असं स्पष्टीकरण गावसकर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिलं.

सुनील गावसकर यांनी शेन वॉर्नबद्दल मत मांडल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. पण त्यासोबतच ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी आणि जुन्या जाणत्या क्रिकेटपटूंनीही गावसकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. गावसकरांनी केलेलं वक्तव्य हे लज्जास्पद असल्याचंही अनेकांनी म्हटलं होतं. या प्रचंड टीकेनंतर अखेर सुनील गावसकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.

टॅग्स :शेन वॉर्नसुनील गावसकरइन्स्टाग्राम
Open in App