विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या जगातला सर्वोत्तम संघ आहे. हा संघ कोणत्याही संघाला कडवं आव्हान देऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. पण, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं म्हणणं काही वेगळंच आहे. रवी शास्त्री यांच्या मते 1985चा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील विजेता संघ कोहलीच्या संघाला कडवी टक्कर देऊ शकतो. सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 1985ची World Championship स्पर्धा जिंकली होती. शास्त्री या संघाचे सदस्य होते आणि त्यांनी या संघाचे कौतुक केले.
World Championship स्पर्धा जिंकण्यात शास्त्री यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी नाबाद 63 धावांची खेळी करताना कृष्णमचारी श्रीकांत यांच्यासोबत 103 धावांची भागीदारी केली होती. त्यांच्या या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं अंतिम सामन्यात पाकिस्तानचे 177 धावांचे लक्ष्य 17 चेंडू राखून सहज पार केले. भारतानं 8 विकेट राखून हा सामना जिंकत जेतेपदाचा चषक उंचावला होता.
या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावणाऱ्या शास्त्रींना तेव्हा ऑडी कार बक्षीस म्हणून देण्यात आली होती. शास्त्री म्हणाले,''त्यात काही शंकाच नाही. 1985चा तो संघ भारताच्या कोणत्याही संघाला मर्यादित षटकांच्या सामन्यात कडवी टक्कर देऊ शकतो. 85चा तो संघ आताच्या टीम इंडियाला पराभूत करू शकतो.'' ‘Sony Ten Pit Stop’ ला दिलेल्या मुलाखतीत शास्त्रींनी हा दावा केला.
1983च्या वर्ल्ड कप विजेत्या संघापेक्षाही हा संघ सरसभारतीय संघानं 1983मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला, परंतु 1985च्या वर्ल्ड चॅम्पियनशीप विजेत्या संघ हा त्या संघापेक्षा सरस असल्याचेही शास्त्री म्हणाले.'' 1985च्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंची योग्या सांगड घातली गेली होती. एल शिवारामकृष्णन आणि मोहम्मद अझरुद्दीनसारखे युवा खेळाडू संघात होते. शिवाय कपिल देव, गावस्कर आणि श्रीकांत हे अनुभवी खेळाडूही होते. त्यामुळे 1983च्या वर्ल्ड कप विजेत्या संघापेक्षा हा संघ मजबूत होता,''असे शास्त्रींनी सांगितले.
Virat Kohli च्या 11 वर्षांच्या सोबत्याचे निधन; अनुष्का शर्मानं वाहिली श्रद्धांजली
Shah Rukh Khan आणखी एक संघ खरेदी करणार; तीन संघांचा मालक होणार