Sunil Gavaskar on Virat Kohli : 20 मिनिटांच्या मार्गदर्शनाने विराट कोहलीचा फॉर्म परत आणून देऊ शकतो; सुनील गावस्कर म्हणाले, माझ्याकडे खास मंत्र! 

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा फॉर्म कधी परत येईल, हा सध्या जागतीक प्रश्न बनला आहे. 2019नंतर विराटला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 12:18 PM2022-07-19T12:18:43+5:302022-07-19T12:24:43+5:30

whatsapp join usJoin us
Sunil Gavaskar on Virat Kohli : "If I had about 20 minutes with Virat Kohli, I will be able to help him." - Sunil Gavaskar   | Sunil Gavaskar on Virat Kohli : 20 मिनिटांच्या मार्गदर्शनाने विराट कोहलीचा फॉर्म परत आणून देऊ शकतो; सुनील गावस्कर म्हणाले, माझ्याकडे खास मंत्र! 

Sunil Gavaskar on Virat Kohli : 20 मिनिटांच्या मार्गदर्शनाने विराट कोहलीचा फॉर्म परत आणून देऊ शकतो; सुनील गावस्कर म्हणाले, माझ्याकडे खास मंत्र! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा फॉर्म कधी परत येईल, हा सध्या जागतीक प्रश्न बनला आहे. 2019नंतर विराटला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. पण, याहीपेक्षा त्याच्या धावांचा ओघ आटत चाललाय... त्याची सरासरी झपाट्याने आपटली आहे. 2008मध्य़े कारकीर्दिच्या सुरुवातीला 30च्या आसपास त्याची सरासरी होती, ती 2022मध्ये 29 पर्यंत आलीय. इंग्लंड दौऱ्यावर ट्वेंटी-20 व वन डे मालिकेतही त्याची कामगिरी 11, 20, 1, 11, 16 व 17 अशी झाली. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यात तो संघाचा भाग नाही. विराट आता जवळपास महिनाभर क्रिकेटपासून दूर राहणार आहे. पण, या विश्रांतीनंतर त्याचा फॉर्म परत येईल का?, हा प्रश्न चाहत्यांना सतावतोय. 

महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी विराटला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ते म्हणाले,''जर मला विराटसोबत 20 मिनिटे दिली, तर मी त्याला फॉर्म परत मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या असत्या. ऑफ स्टम्प बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद होण्याची त्याची समस्या मी पूर्णपणे सोडवू शकतो. त्या चेंडूवर बाद होण्याची काही कारणं आहेत आणि एक सलामीवीर म्हणून मला ती माहिती आहेत. मला 20 मिनिटे दिली तर मी त्याला ते समजावून सांगू शकतो.''

''फॉर्म चांगला सुरू नसल्यामुळे तो प्रत्येक चेंडूवर धावा करण्याचा प्रयत्न करतोय. इथूनच खरी समस्या सुरू होतेय. धावा झाल्या की त्याला समाधान मिळते आणि त्यासाठी तो अशा चेंडूंवरही धाव करण्याचा प्रयत्न करतोय, की जे त्याने फॉर्म चांगला असताना सोडले असते. त्याचा फॉर्म परत कधी येईल, याची आपल्याला वाट पाहावी लागेल. भारतासाठी त्याने 70 शतकं झळकावली आहेत, म्हणजे क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये त्याने धावा केल्या आहेत,''असेही गावस्कर म्हणाले.  

कोहलीने मागील पाच वन डे सामन्यात ८, १८, ०, १६ व १७ धावा केल्या आहेत आणि वन डे क्रिकेटमध्ये प्रथमच त्यानं सलग पाच सामन्यांत २० पेक्षा कमी धावा केल्या. २०२२ या कॅलेंडर वर्षात कोहलीची सरासरी ही २५.०५ इतकी राहिली आहे आणि २००८नंतर ( ३१.८०) प्रथमच त्याच्यावर ही नामुष्की ओढावली. ७९ डावांत त्याला शतकावीना रहावे लागले आहे.  
 

Web Title: Sunil Gavaskar on Virat Kohli : "If I had about 20 minutes with Virat Kohli, I will be able to help him." - Sunil Gavaskar  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.