Sunil Gavaskar on Shane Warne: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न याचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या ५२व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. तो थायलंडमध्ये असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अकाली निधनानंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर श्रद्धांजली वाहण्यात आली. पण लिटल मास्टर सुनील गावसकर मात्र शेन वॉर्नबद्दलच्या वक्तव्यामुळे दुसऱ्यांदा नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी ठरले.
एका कार्यक्रमात बोलताना सुनील गावसकर म्हणाले होते, 'शेन वॉर्न याने आपलं जीवन मनसोक्त जगलं. तो किंग साईज लाईफ जगायचा. कदाचित त्याची तशी जीवनपद्धती त्याच्या हृदयाला झेपली नाही.' लाईव्ह टीव्हीवर सुनील गावसकर यांनी तसं विधान करायला नको होतं असा सूर नेटकऱ्यांमध्ये दिसून आला. त्यानंतर आता आणखी एका मतावरून गावसकर टीकेचं लक्ष्य ठरले आहेत. एका टीव्ही शो मध्ये बोलताना गावसकर म्हणाले, 'मुथय्या मुरलीधरन हा शेन वॉर्नपेक्षा चांगला स्पिनर होता. शेन वॉर्नचे भारतातील किंवा भारताविरूद्धचे आकडे पाहिल्यास ते खूपच सामान्य होते.'
सुनील गावसकर यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत होतं. त्यांची क्रिकेटबद्दलची समज ही नक्कीच चांगली आहे. पण शेन वॉर्नबद्दल असं मत व्यक्त करण्याची ती वेळ योग्य नव्हती, असं मत एका ट्वीटर युजरने व्यक्त केलं. तसेच, सुनील गावसकर यांना अशा मुलाखतीत बोलवू नये अशीही कमेंट काही युजर्सने केली. याशिवाय, ब्रिटीश आणि ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनीही गावसकरांचं 'टायमिंग' चुकल्याची भावना व्यक्त केली.
Web Title: Sunil Gavaskar reaction on Shane Warne Fans get angry say this is not the right time Muttiah Muralitharan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.