नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये मागील काही दिवसानत अनेक बदल झाले आहेत. रोहित शर्माने कर्णधारपदी विराजमान झाल्यानंतर अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. यातच भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माला एक मोलाचा सल्ला दिला आहे. गावसकर यांनी रोहितला एका धडाकेबाज खेळाडूला संघात घेण्याचा सल्ला दिला आहे.
सुनील गावस्कर यांनी ऋतुराज गायकवाड याला संघात घेण्याचा सल्ला दिला आहे. रोहितने आपल्यासोबत गायकवाडचा सलामीवीर म्हणून वापर करावा अशी गावसकरांची इच्छा आहे. स्टार स्पोर्ट्सच्या एका शोमध्ये बोलताना गावस्कर म्हणाले, 'मला आशा आहे की, रोहित गायकवाडला संधी देईल. तुमचे लक्ष आगामी T20 वर्ल्ड कपवर असेल, तर तुम्हाला अधिकाधिक खेळाडूंची पारख करावी लागेल.' विशेष म्हणजे, ऋतुराज गायकवाडने IPL 2021 मध्ये CSK साठी अप्रतिम कामगिरी केली होती. गायकवाडने गेल्या मोसमात ऑरेंज कॅपही जिंकली होती.
'रहाणे-पुजारा बाहेर पडणे ठीक'श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात वरिष्ठ फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची निवड न करण्याच्या निर्णयाचेही गावस्कर यांनी समर्थन केले. 'पुजारा आणि रहाणेसाठी हे अपेक्षित होते, कारण दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी शतक झळकावले असते किंवा कोणी 80-90 धावांची इनिंग खेळली असती तर गोष्ट वेगळी असती. होय, अजिंक्य रहाणेने (जोहान्सबर्गमध्ये) अर्धशतक झळकावले पण त्याखेरीज त्याच्याकडून धावा अपेक्षित असतानाही फारशा धावा झाल्या नाहीत,'असे गावस्कर म्हणाले. सध्या, रहाणे आणि पुजारा आपापल्या मुंबई आणि सौराष्ट्र संघांसाठी रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ:रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद. शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि सौरभ कुमार.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय T20 संघ:रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि आवेश खान.