Join us  

आज ३ कसोटींची मागणी करता, उद्या....! रोहित शर्माच्या मागणीवर सुनील गावस्कर संतापले

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी WTC Final ही ३ सामन्यांची मालिका असायला हवी, अशी मागणी केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 3:48 PM

Open in App

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी WTC Final ही ३ सामन्यांची मालिका असायला हवी, अशी मागणी केली होती. पण, महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी रोहितची ही कल्पना खोडून काढली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने २०९ धावांनी विजय मिळवला. रोहितने सांगितले की, ही फायनल ३ सामन्यांची मालिका असायला हवी होती. खूप मेहनत करून आम्ही इथवर पोहोचलो आणि संघ एकच सामना खेळला. अशा स्थितीत तीन सामन्यांची फायनल झाली असती तर बरे झाले असते.

रोहितने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, मला WTC फायनलसाठी ३ सामन्यांची मालिका खेळायची आहे. आम्ही खूप मेहनत केली आणि लढलो. पण आम्हाला फक्त १ सामना मिळाला. पुढील सर्कलमध्ये ती ३ सामन्यांची मालिका बनवायला हवी. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी रोहितची शाळा घेतली. इंडिया टुडेशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, प्रत्येक संघाला माहित आहे की डब्ल्यूटीसी सायकलमध्ये फक्त एकच फायनल खेळली जाईल. आयपीएलमध्येही खेळाडू बेस्ट ऑफ थ्रीबद्दल बोलतात का?  

गावसकर यांनी म्हटले की, डब्ल्यूटीसीमध्ये फक्त एकच फायनल खेळण्याची योजना फार पूर्वीपासून आहे. जेव्हा तुम्ही ही सायकल खेळायला सुरुवात करता तेव्हाच तुम्हाला याची माहिती असते. अशा परिस्थितीत, हे सर्व एक निमित्त आहे. मानसिक तयारी करावी लागेल. जसे तुम्ही आयपीएल फायनलसाठी सज्ज होता. आपण तीन सामन्यांच्या मालिकेची मागणी करू शकत नाही. आज तुम्ही बेस्ट ऑफ थ्री म्हणत आहात. उद्या तुम्ही बेस्ट ऑफ ५ म्हणाल. 

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धासुनील गावसकररोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआयपीएल २०२३
Open in App