Join us  

"जय शाह ICC चे अध्यक्ष झालेच तर...", सुनिल गावस्कर यांचा मोठा दावा, भाकीत वर्तवलं

bcci secretary : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 8:05 PM

Open in App

jay shah icc chairman : बीसीसीआय सचिव जय शाहआयसीसीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार का याची सर्वत्र चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) लवकरच नवा अध्यक्ष मिळणार आहे. या शर्यतीत बीसीसीआय सचिव जय शाह यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याची सर्वत्र चर्चा आहे. १६ पैकी १५ सदस्यांचा जय शाह यांना पाठिंबा असल्याने ते आयसीसीचे नवे अध्यक्ष असतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे. अशातच भारताचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी एक मोठा दावा केला.

विशेष म्हणजे जय शाह यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी खूप कमी वेळ उरला आहे, कारण अधिकृत नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत २७ ऑगस्ट ही आहे. जशी चर्चा रंगली आहे त्यानुसार जय शाह आयसीसीचे नवे अध्यक्ष असतील असे मला वाटते. तसे झाल्यास त्यांनी ज्याप्रमाणे भारतीय क्रिकेटसाठी केले आहे. त्याचप्रमाणे जगभरातील पुरुष आणि महिला खेळाडूंनाही मोठा फायदा होईल, असे गावस्करांनी नमूद केले.  

गावस्करांचे भाकीत 

दरम्यान, २७ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पण, अद्याप जय शाह यांनी या पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. अशातच भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी शाह यांनी या पदाची जबाबदारी स्वीकारल्यास जगभरातील क्रिकेटसाठी फायद्याचे ठरेल असे भाकीत केले. याशिवाय त्यांनी जय शाह यांच्यावर झालेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांना त्यांच्या पदावरून पायउतार होण्यास भाग पाडले गेल्याचा आरोप गावस्करांनी फेटाळून लावला. त्यांनी स्पोर्ट्स स्टारसाठी लिहिलेल्या लेखात आपले मत मांडले.

दरम्यान, आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबरला संपत आहे. जय शाह २०१९ मध्ये पहिल्यांदा बीसीसीआयचे सचिव बनले. त्यानंतर २०२२ मध्ये दुसऱ्यांदा त्यांच्याकडे ही जबाबदारी आली. २०२५ मध्ये त्यांच्या या पदाचा कार्यकाळ संपुष्टात येईल. 

टॅग्स :जय शाहसुनील गावसकरआयसीसीबीसीसीआयआंतरराष्ट्रीय क्रिकेट