Join us  

Sunil Gavaskar: "T20 World Cup 2022 मध्ये 'या' खेळाडूची टीम इंडियात निवड होणारच"; सुनील गावसकर यांना विश्वास

सुनील गावसकरांनी यामागचं कारणही सांगितलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:22 PM

Open in App

Sunil Gavaskar, T20 World Cup 2022: भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी T20 World Cup 2022 च्या संदर्भात एक मोठी भविष्यवाणी केली. सुनील गावस्कर यांच्या मते, टीम इंडिया यंदा ज्यावेळी ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषकासाठी जाईल, त्यावेळी एक खेळाडू हा संघात नक्कीच असेल. इतकेच नव्हे तर सुनील गावस्कर यांच्या म्हणण्यानुसार, तो टी२० विश्वचषकाच्या संघात 'ऑटोमॅटिक पिक' म्हणजेच सर्वानुमते निवडला जाईल.

भारताचे लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, 'हार्दिक पांड्या (Hardik Pandya) गोलंदाजी करेल की नाही, तो किती षटके टाकेल, याची वाट केवळ गुजरात टायटन्सच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रिकेट वाट पाहत आहे. जर हार्दिक पांड्याने त्याच्या फलंदाजी सोबतच चांगली गोलंदाजी सुरू केली आणि कोणतीही चूक केली नाही, तर तो टी२० विश्वचषकासाठी आपोआपच निवडला (ऑटोमॅटिक पिक) जाईल. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्या आयपीएल सामन्यात सुमारे १४० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी केली. मात्र, या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. हार्दिक नियमितपणे गोलंदाजी करत राहिल्यास भारताच्या टी२० विश्वचषक संघात तो नक्कीच निवडला जाईल, असा विश्वास सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला.

७ महिन्यांनंतर ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक होणार आहे. त्यात हार्दिक पांड्याची भूमिका महत्त्वाची असू शकते. टीम इंडियाने जवळपास एका दशकापासून एकही ICC ट्रॉफी जिंकलेली नाही. गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला साखळी फेरीच्या पुढे जाता आलं नाही. ऑक्टोबर २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकानंतर, हार्दिक पांड्या थेट आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मैदानात परतला. टी२० विश्वचषकापासून हार्दिक पांड्या सतत त्याच्या गोलंदाजीवर काम करत होता. पहिल्या सामन्यात त्याची मेहनत दिसून आली.

टॅग्स :आयपीएल २०२२सुनील गावसकरहार्दिक पांड्याट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App