Join us  

Sunil Gavaskar Shocking Reaction on Shane Warne Death : "शेन वॉर्नचा म्हणूनच हार्ट अ‍ॅटकने मृत्यू झाला"; सुनील गावसकर यांचं धक्कादायक विधान

"वॉर्नबद्दल असं टीव्हीवर बोलणं बरोबर नाही"; नेटकरी गावसकरांवर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 1:43 PM

Open in App

Sunil Gavaskar Shocking Reaction on Shane Warne Death : महान लेग स्पिनर शेन वॉर्न याचा शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तो थायलंडमध्ये असताना त्याच्या व्हिलामध्ये ही घटना घडली. वैद्यकीय उपचारांनी त्याला पुनरूज्जीवित करण्याचे प्रयत्न करण्यात आले, पण त्याने उपचारांना प्रतिसाद न दिल्याने तो मृत असल्याचं घोषित करण्यात आलं. शेन वॉर्नच्या अकाली निधनानंतर साऱ्यांनीच शोक व्यक्त केला आणि ट्वीटच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली वाहिली. शेन वॉर्न सोबतच्या आठवणी यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने खास चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यावेळी भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी एक धक्कादायक विधान केलं. अनेक नेटकऱ्यांना ते विधान पटलं नसल्याचंही दिसून आलं.

एका वृत्तवाहिनीवर गावसकर यांना शेन वॉर्न यांच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी गावसकर म्हणाले की वॉर्नच्या निधनाचं वृत्त ऐकून मला खरंच धक्का बसला. ५२व्या वर्षी एखादा व्यक्ती मरण पावतो तेव्हा नक्कीच ते धक्कादायक असतं. माझ्या मुलाने मला संध्याकाळी मेसेज करून विचारलं होतं की ही गोष्ट खरी आहे का.. त्यावेळी मला काय बोलावं हे कळत नव्हतं. शेन वॉर्नच्या निधनाने फक्त ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्याच नव्हे तर भारतीय क्रिकेटचंही खूप मोठं नुकसान झालंय.

"शेन वॉर्न आणि मी एकत्र खेळलो नाही. पण कॉमेंट्रीच्या निमित्ताने आम्ही अनेकदा एकत्र असायचो. शेन वॉर्न नेहमी मला विचारत असे की संध्याकाळी काही प्लॅन आहेत का... वॉर्न कायमच किंग साईज लाईफ जगायचा. तो कायम लाईफ एन्जॉय करायचा. कदाचित त्याचं तेच आलिशान लाईफ जगण्याचा अंदाज त्याच्या हृदयाला झेपला नाही", असं धक्कादायक विधान गावसकर यांनी केलं.

--

--

--

--

गावसकर यांनी केलेलं विधान काही नेटकऱ्यांना पटलं नाही. सुनील गावसकर यांच्या विधानाबाबत सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केल्याचं दिसून आलं.

टॅग्स :शेन वॉर्नसुनील गावसकरसोशल मीडिया
Open in App