गावसकर यांनी केली नासिर हुसेनची बोलती बंद!

विराटच्या संघाच्या तुलनेत आधीचे भारतीय संघ कमकुवत असल्याचा दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 10:09 AM2021-08-27T10:09:35+5:302021-08-27T10:10:04+5:30

whatsapp join usJoin us
Sunil Gavaskar stops Nasir Hussain from comparing of virat kohli's and previous Indian teams! pdc | गावसकर यांनी केली नासिर हुसेनची बोलती बंद!

गावसकर यांनी केली नासिर हुसेनची बोलती बंद!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लीड्स : दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनला समालोचन करताना फटकारले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघापेक्षा भारताच्या मागील संघांना मैदानात धमकावणे सोपे होते, असे विधान हुसेनने केले होते.

आमच्या पिढीतील क्रिकेटपटूंना धमकावले जाऊ शकते, असे म्हटल्यास मी खूप रागावेन, असे गावसकरांनी हुसेनला सांगितले. या दोघांचा एका लेखावरूनदेखील वाद झाला. इंग्लंडच्या माजी कर्णधाराने हा लेख एका ब्रिटिश वृत्तपत्रासाठी लिहिला आहे. त्यात हुसेनने लिहिले, ‘पूर्वीचे भारतीय संघ सध्याच्या संघाच्या तुलनेत मजबूत नव्हते.’
आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पाच वेळा (१९७१, १९७४ १९७९, १९८२, १९८६) इंग्लंड दौरा केलेले गावसकर यांनी ऑन-एअर हुसेनला विचारले, ‘तुम्ही म्हणाला भारतीय संघाला धमकावले जाऊ शकत नाही, तर मागील पिढीच्या संघांना धमकावले जाऊ शकत होते. तुम्ही कोणत्या पिढीबाबत बोलत आहा ते सांगा? आणि बुली म्हणजे नक्की काय?’
हुसेन म्हणाला, ”मला असे वाटते की, पूर्वीचे भारतीय संघ आक्रमकतेला नाही, नाही म्हणत होते, पण कोहलीने जे केले ते दुहेरी आक्रमकता दर्शवत आहे. मी त्याची एक झलक सौरव गांगुलीच्या संघात पाहिली. त्याने ही सुरुवात केली. विराट संघात नसतानाही अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियन संघावर वर्चस्व गाजवले.’

गावसकर यांनी हुसेन यांचे दावे आकडेवारीने खोडून काढले. ते म्हणाले, “जेव्हा तुम्ही म्हणता की मागील पिढीतील संघांना धमकावले जाऊ शकते. तुम्ही रेकॉर्ड बघितले तर १९७१ मध्ये आम्ही जिंकलो, हा माझा पहिला इंग्लंड दौरा होता. १९७४ मध्ये   आम्ही ०-३ ने हरलो. १९७९ मध्ये ०-१ ने हरलो, ओव्हलवर ४२९ धावांचा पाठलाग केला असता तर मालिका १-१ होऊ शकली असती.’

Web Title: Sunil Gavaskar stops Nasir Hussain from comparing of virat kohli's and previous Indian teams! pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.