Sunil Gavaskar XI for WTC Final: माजी कर्णधार अजिंक्य रहाणे याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलवर ७ ते ११ जून या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनल कसोटीसाठी मंगळवारी भारतीय संघात स्थान देण्यात आले. रहाणे १५ महिन्यांनंतर संघात परतला. श्रेयस अय्यर पाठदुखीमुळे बाहेर असल्याने ८२ कसोटींचा अनुभव असलेल्या रहाणेला स्थान मिळाले.
अजिंक्यने जानेवारी २०२२ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरची कसोटी खेळली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यांच्या संघात पाच वेगवान गोलंदाज, तीन फिरकीपटू, एक यष्टिरक्षक आणि सहा फलंदाजांना स्थान मिळाले. स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांना मात्र वगळण्यात आले आहे. रहाणेला आयपीएलमधील शानदार कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. आपल्या आक्रमक वृत्तीमुळे त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
डब्ल्यूटीसीच्या फायनलसाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार, कोणाला संधी मिळणार याची सध्या चर्चा रंगली आहे. याचदरम्यान भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी फायनलसाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना गावस्कर यांनी त्यांच्या आवडीचे ११ खेळाडू निवडले आहेत, जे डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरू शकतात.
सुनील गावस्कर यांनी निवडलेली प्लेइंग इलेव्हन:
शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल (विकेटीकीपर), रविंद्र जडेजा, आर. अश्विन, जयदेव उनादकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद सिराज, मो. शमी, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"