भारत इंग्लंडविरुद्ध ४-० ने जिंकेल; सुनील गावसकर यांचे भाकीत

एका वृत्तपत्राशी बोलताना गावसकर म्हणाले, ‘डब्ल्यूटीसी फायनलचा परिणाम इंग्लंडविरुद्ध जाणवणार नाही, कारण ही मालिका सहा आठवड्यानंतर सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 06:49 AM2021-06-05T06:49:57+5:302021-06-05T06:50:55+5:30

whatsapp join usJoin us
Sunil Gavaskars big prediction India will beat England 4 0 | भारत इंग्लंडविरुद्ध ४-० ने जिंकेल; सुनील गावसकर यांचे भाकीत

भारत इंग्लंडविरुद्ध ४-० ने जिंकेल; सुनील गावसकर यांचे भाकीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : ‘भारतीय संघ ४ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत वेगवान गोलंदाजांच्या बळावर आगामी इंग्लंडवर ४-० ने विजय साजरा करेल,’ असे भाकीत दिग्गज सुनील गावसकर यांनी शुक्रवारी वर्तविले आहे.

भारताचे वेगवान गोलंदाज यजमान फलंदाजांना त्रस्त करतील, असेही ते म्हणाले. एका वृत्तपत्राशी बोलताना गावसकर म्हणाले, ‘डब्ल्यूटीसी फायनलचा परिणाम इंग्लंडविरुद्ध जाणवणार नाही, कारण ही मालिका सहा आठवड्यानंतर सुरू होणार आहे. ही मालिका भारत सहजपणे जिंकेल, यात शंका नाही. ‘इंग्लंडमधील वातावरणात ड्यूक चेंडूची मोठी भूमिका असते. गोलंदाजांनुसार खेळपट्टी असेल तर चेंडू स्विंग होताना दिसतो. इंग्लंडने वेगवान गोलंदाजांना पूरक खेळपट्ट्या तयार केल्यास भारतीय गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडतील. 

फेब्रुवारीत इंग्लंडने भारताचा दौरा केला त्यावेळी फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर सडकून टीका केली होती. ही मालिका त्यांनी ३-१ ने गमावली. अशावेळी आपल्या खेळपट्ट्यांवर भारताला नमवून वचपा काढण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असेल, ’ असे मत गावसकर यांनी व्यक्त केले. ‘इंग्लिश गोलंदाज कसे यशस्वी होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन ईसीबी खेळपट्ट्या तयार करेल, असा अंदाज आहे. खेळपट्टीवर गवत असल्यास आश्चर्य वाटू नये. भारताला मात्र घाबरण्याची गरज नाही. प्रत्येक सामन्यात २० गडी बाद करण्याची भारतीय गोलंदाजांमध्ये क्षमता आहे, असे गावसकर यांनी सांगितले.

इंग्लंड आपल्या गोलंदाजांना लाभदायी ठरेल, अशा खेळपट्ट्या बनविणार आहे. हलके गवत ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे भारताची गोलंदाजी भेदक असल्यामुळे फलंदाजांना सामन्यात दोनदा बाद करण्यात काहीही अडचण येणार नाही.
- सुनील गावसकर
 

Web Title: Sunil Gavaskars big prediction India will beat England 4 0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.