Join us  

0 6 4 4 6 6 4 6 0 4 6 1 6; वेस्ट इंडिजचा फलंदाज भलताच पेटला, १६ चेंडूंत ३५६च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांना कुटला, Video

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात ( India vs West Indies) कोलकाता येथे पहिली ट्वेंटी-२० लढत सुरू आहे. वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर ५२ धावांवर माघारी पाठवून भारतीय संघाने सामन्यावर पकड मजबूत केली आहे. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 7:51 PM

Open in App

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात ( India vs West Indies) कोलकाता येथे पहिली ट्वेंटी-२० लढत सुरू आहे. वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर ५२ धावांवर माघारी पाठवून भारतीय संघाने सामन्यावर पकड मजबूत केली आहे. पण, तेच बांगलादेशमध्ये वेस्ट इंडिजच्या फलंदाजानं कहर आणला आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये ( BPL) चत्तोग्राम चॅलेंजर्स ( Chattogram Challengers) संघाविरुद्ध कोमिला व्हिक्टोरियन्स ( Comilla Victorians) संघाकडून खेळताना विंडीजच्या या अष्टपैलू खेळाडूने १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १६ चेंडूंत ५ चौकार व ६ षटकार खेचून ५७ धावा कुटल्या.

कोलकाता नाईट रायडर्सचा अष्टपैलू सुनील नरीन ( Sunil Narine ) याच्या तुफान खेळीनं आज सर्वांचे लक्ष वेधले. मेहिदी हसन ( ४४) आणि अकबर अली  ( ३३) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर चॅलेंजर्सनी १४८ धावांचा पल्ला उभा केला. पण, व्हिक्टोरियन्सकडून सलामीला आलेल्या नरीनने धु धु धुतले. त्याच्यासमोर फिरकी गोलंदाजांना आणण्याची चूक महागात पडली. त्याने पहिल्या ८ चेंडूंत  6,4,4,6,6,4,6,0 अशी फटकेबाजी करताना ३६ धावा चोपल्या. त्यानंतर त्यानं १३ चेंडूंत BPLमधील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. त्यानं १६ चेंडूंत ३५६.२५ च्या स्ट्राईक रेटने ५७ धावांची वादळी खेळी केली आणि त्यात ५ चौकार व ६ षटकारांचा समावेश आहे.  

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :वेस्ट इंडिजबांगलादेशटी-20 क्रिकेट
Open in App