Join us

IPL 2021: शुबमन गिलच्या हटके 'हेअर स्टाइल'ची चर्चा; काय आहे यामागचं गुपीत? कुणी केला 'हेअर कट'? 

आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 20:28 IST

Open in App

IPL 2021: आयपीएलमध्ये आज कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा पंजाब किंग्ज (Punjab Kings) विरुद्ध सामना खेळवला जात आहे. कोलकाताची प्रथम फलंदाजी असून संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिलच्या हटके हेअर स्टाइलनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या हेअरकटची चर्चा सुरू झाल्यानंतर आजचा सामना सुरू होण्याआधी त्याच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली आणि त्यानं आपल्या हेअरकट मागचं गुपीत उघड केलं आहे. 

शुबमन गिलच्या हेअरकट मागे दुसरं तिसरं कुणी नसून त्याच्याच संघातील वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नारायण याचा हात आहे. सुनील नारायण आमच्या संघाचा हेअर ड्रेसर असल्याचं मिश्किलपणे सांगत शुबमननं सुनील यानंच आपला हेअरकट केल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या पहिल्या टप्प्यात मे महिन्यात केकेआरचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यानंही सुनील नारायण केकेआरच्या संघाचा हेअर ड्रेसर असल्याचं सांगितलं होतं. 

आता शुबमन गिलच्या हटके लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतल्यानंतर पुन्हा एकदा सुनील नारायण याचं नाव समोर आलं आहे. आजचा सामना सुरू होण्याआधी शुबमन गिल हटके लूकमध्ये पाहायला मिळाला. याबाबत बोलताना शुबमन म्हणाला, "काल रात्री सुनील नारायण यानं हा हेअरकट केला आहे. मला वाटत होतं की काहीतरी वेगळा हेअरकट करण्याची गरज आहे. त्यामुळे नरेननं असा लूक सुचवला", असं शुबमननं सांगितलं. 

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात निराशाजनक कामगिरीची नोंद केलेल्या कोलकाताच्या संघानं दुसऱ्या टप्प्यात चमकदार कामगिरीची नोंद करत सर्वांना धक्का दिला आहे. "पहिल्या टप्प्यात आम्ही ज्या क्रमांकावर होतो ते आमच्यासाठी खरंच अलर्ट करणारं होतं. त्यामुळे संघातील प्रत्येकाला आणखी जवळ आणलं आणि आपल्याला कोणत्या प्रकारचं क्रिकेट खेळायची गरज आहे. खूप मेहनत घ्यायची गरज आहे याची अधिक जाणीव निर्माण झाली आणि त्याच मानसिकतेनं आम्ही दुसऱ्या टप्प्यात सुरुवात केली. पुढील सर्व सामने आम्ही जिंकू अशी आम्हाला आशा आहे", असंही शुबमन म्हणाला. 

टॅग्स :शुभमन गिलआयपीएल २०२१कोलकाता नाईट रायडर्स
Open in App