मुंबई : बॉलीवूड स्टार सनी लिओनीने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्याला आवडत्या खेळाडूबाबत वक्तव्य केले आहे. मला महेंद्रसिंग धोनी आवडतो, असे तिने या मुलाखतीमध्ये सांगितले. पण सनीला धोनी का आवडतो, हे तुम्हाला माहिती आहे का...
धोनी 37 वर्षांचा असला तरी युवा खेळाडूला लाजवेल, असा त्याचा फिटनेस आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून धोनीने आपला लौकिक कायम राखला आहे. काही दिवासांपूर्वी धोनीला विश्वचषकाच्या संघात खेळवायचे का, यावर बरीच चर्चा सुरु होती. धोनीवर बरीच टीकाही झाली. पण धोनीने आपल्या कामगिरीच्या जोरावर टीकाकारांच्या तोंडाला कुलूप लावले. आता धोनी हा भारतीय संघाचा अविभाज्य भाग बनला आहे आणि त्याच्याशिवाय विश्वचषकात भारतीय संघ खेळू शकत नाही, असे काही जणांचे म्हणणे आहे.
एका क्रिकेट वेबसाईटचे उद्धाटन सनीच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तिला, तुझा आवडता क्रिकेटपटू कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी सनी विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल यांच्यापैकी कुणाचे तरी नाव घेईल, असे काही जणांना वाटत होते. पण सनीने क्षणाचाही विलंब न लावता धोनीचे नाव यावेळी घेतले.
सनी धोनीबद्दल म्हणाली की, " धोनी हा एक फॅमिली मॅन आहे. धोनीचे मुलगी झिवा ही फारच क्यूट आहे. मी धोनी आणि झिवाचे काही फोटो पाहिले. फारच सुंदर त्या दोघांचे फोटो आहेत. त्यामुळे मला सर्व खेळाडूंमध्ये धोनी सर्वात जास्त आवडतो."
स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये आमच्या खेळाडूंची काय चूक होती? - महेंद्रसिंग धोनी‘आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील २०१३ साली झालेली स्पॉट फिक्सिंगची घटना माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट घटना होती. यामुळे मी पहिल्यांदाच अत्यंत निराश झालो होतो,’ असे सांगत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पहिल्यांदाच या फिक्सिंग प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, ‘या प्रकरणात खेळाडूंची काय चूक होती?’ असा प्रतिप्रश्नही धोनीने केला.गेल्या सहा वर्षांपासून क्रिकेटप्रेमींना या प्रकरणावर धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. कारण यामध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या संघावर दोन वर्षांची बंदी लागलीच, शिवाय फिक्सिंग प्रकरणामध्ये धोनीवरही शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यामुळेच आपण आयुष्यात पहिल्यांदाच निराशेच्या गर्तेत अडकलो होतो, असे धोनीने स्पष्ट केले.गेल्या वर्षी शानदार पुनरागमन केलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने थेट जेतेपदावर कब्जा करत आपला हिसका दाखवून दिला. या धमाकेदार पुनरागमनावर आधारित असलेल्या ‘रोर आॅफ दी लायन’ या वेब सीरिजमध्ये धोनीने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये धोनीने म्हटले आहे की, ‘या प्रकरणाआधी मी कधीच इतका निराश झालो नव्हतो. या घटनेनंतर माझ्या संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आणि दोन वर्षे आमचा संघ आयपीएल खेळू शकला नाही. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वात खराब वेळ होती. २००७ साली भारतीय संघ खराब प्रदर्शनामुळे हरला होता, पण २०१३चे स्पॉट फिक्सिंग प्रकरण पूर्णपणे वेगळे होते.’