- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
दिल्ली कॅपिटल्सकडून एलिमिनेटरमध्ये पराभूत होताच सनरायझर्स हैदराबादचे आव्हान संपुष्टात आले. या सामन्यात आम्ही सर्वोत्कृष्ट खेळ केला नाही. फलंदाजी चांगलीच केली पण काही बाबतीत कमी पडलो. या मोहिमेतून बरेच शिकायला मिळाले. धावा बऱ्यापैकी काढल्या तरी चाहत्यांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणही तगडे असायला हवे होते, ही बाब पुढे आली.
विशाखापट्टणममध्ये आधीही खेळण्याचा अनुभव असल्याने दिल्लीला नमविण्यासाठी परिस्थितीचा लाभ घ्यायला हवा होता. रिद्धिमान साहाला लवकर गमविल्यानंतरही मार्टिन गुप्टिल याने बºयापैकी सावरले. तथापि सलग तिसऱ्यांदा आम्ही मधल्या षटकांत फिरकीविरुद्ध लय गमावली. फिरकीचा सामना करू शकणारे चांगले खेळाडू आमच्याकडे आहेत, त्यामुळे कौशल्याच्या तुलनेत दृष्टिकोन महत्त्वपूर्ण ठरू शकला असता. या सामन्यात धावा तर स्पर्धात्मक होत्या, पण अटीतटीच्यावेळी आम्ही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कमी पडलो. त्याआधीच्या सामन्यात शानदार सुरूवात आणि वर्चस्वपूर्ण ‘फिनिशिंग’ यादरम्यान आमचे ‘सँडविच’ झाले. हा अनुभव पाहता आम्ही १०-१५ धावांनी कमी पडलो, असे मला वाटते.
दिल्ली पॉवर प्लेमध्ये धडाका करतो याची आम्हाला जाणीव होती. शिखर धवनला लवकर अडकविल्यानंतरही पृथ्वी शॉने डाव सावरला. त्याची फटकेबाजी शानदार ठरली. पृथ्वीचे स्ट्रोक पाहून मी प्रभावित झालो. आम्ही त्याला जीवदानही दिले. झेल सोडण्याची डोकेदुखी या मोसमात आमच्यासाठी त्रासदायकच ठरली. अर्धशतक गाठणाºया पृथ्वीला बाद करण्यात अखेर यश आले. अखेरच्या चार षटकात दिल्लीला विजयासाठी ४२ धावांची गरज असताना आम्हाला विजयाची खात्री वाटत होती. रिषभ पंत मात्र बासिल थम्पीवर अक्षरश: तुटून पडला. रिषभ भारतीय क्रिकेटचे भविष्य आहे. विजयावर शिक्कामोर्तब करण्यात तो अपयशी ठरला तरीही त्याची प्रगल्भता प्रभावित करून गेली.
हैदराबाद संघात असलेल्या अनेक उणिवानंतरही मागील तीन सामन्यात माझ्या संघाने अखेरच्या षटकापर्यंत व एका लढतीत सुपर ओव्हरपर्यंत दाखविलेल्या झुंजारवृत्तीवर मी खूश आहे. सध्याची कामगिरी व पुढील सत्राची सुरुवात या काळात बºयाच गोष्टी सुधारण्याची गरज असेल. आम्ही बलस्थाने आणि उणिवा यात आमूलाग्र सुधारणा करीत पुढील सत्रात अर्थात आयपीएल-१३ मध्ये आणखी बलाढ्य होऊन सहभागी होऊ, अशी मला खात्री आहे.
Web Title: Sunrise Hyderabad will be strong
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.