सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूने केलं लग्न; पत्नी Wine टेस्टर म्हणून करते काम

इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाचा कर्णधार एडन मार्कराम ( Aiden Markram) याने लग्न केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:22 PM2023-07-22T23:22:30+5:302023-07-22T23:22:54+5:30

whatsapp join usJoin us
Sunrisers Hyderabad captain aiden markram marry with Nicole Danielle O' Connor | सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूने केलं लग्न; पत्नी Wine टेस्टर म्हणून करते काम

सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूने केलं लग्न; पत्नी Wine टेस्टर म्हणून करते काम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाचा कर्णधार एडन मार्कराम ( Aiden Markram) याने शनिवारी गर्लफ्रेंड निकोल डॅनिएल ओ'कॉनर सोबत लग्न केलं. २५ जून २०२२ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. ही दोघं एकमेकांना १२ वर्षांपासून डेट करत आहेत. निकोलने इंस्टाग्रावर फोटो पोस्टकरून ही आनंदाची बातमी दिली. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मार्करामने ३५ कसोटींत ६ शतकं व १० अर्धशतकांसह २२८५ धावा केल्या आहेत. ५० वन डे व ३४ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याच्या नावावर अनुक्रमे १४४० व ९६६ धावा आहेत. 
 

काव्या मारनला 'टफ फाईट'! IPL २०२३ मध्ये 'निकोल'ची जादू....

 


निकोल डॅनिएली ओ'कॉनर खूप सुंदर आहे. ती एक उद्योजिका आहे आणि आयपीएलच्या या मोसमात ती SRH ला चिअर करण्यासाठी भारतात आली होती. मार्करामने SA20 मध्ये सनरायझर्स इस्टर्न कॅपला चॅम्पियन बनवले. एडन आणि निकोल १२ वर्षांहून अधिक काळ एकत्र आहेत. दोघे हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांची भेट झाली. त्या काळात एडन क्रिकेटसोबत रग्बी खेळत असे. २०१२ सालात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि तेव्हापासून हे कपल एकत्र आहे.


निकोल ही व्यवसायाने उद्योजक आहे. त्यांची 'नादौरा ज्वेलरी' नावाची ज्वेलरी विकणारी कंपनी आहे. निकोल अनेक प्रसंगी तिच्या कंपनीसाठी मॉडेलिंग करताना दिसली आहे. दागिन्यांच्या व्यवसायासोबतच निकोल वाईन टेस्टिंगही करते. तो जगभरातील वाईन चाखण्याचा आनंद घेतो. निकोल समाजसेवेतही पुढे आहे. ती 'अब्बा हाऊस' या संस्थेसोबत अनाथ मुलांचे पालनपोषण आणि जगण्याच्या क्षेत्रात काम करते.

Web Title: Sunrisers Hyderabad captain aiden markram marry with Nicole Danielle O' Connor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.