नवी दिल्ली : अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार पार पडला. त्यामुळे आता आयपीएल हळू हळू आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. मंगळवारी आयपीएलच्या सर्व फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. आयपीएल २०२३च्या रिटेंशन नंतर सर्वाधिक पर्स सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीकडे शिल्लक राहिली आहे.
दरम्यान, हैदराबादच्या फ्रँचायझीने १२ खेळाडूंना संघातून बाहेर करून जवळपास नवीन संघ तयार करण्याची रणनिती आखली आहे. मात्र भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनेलवरून संवाद साधताना म्हटले, "हैदराबादच्या फ्रँचायझीबद्दल काय बोलायचे? त्यांच्याकडे ४२ कोटी रूपये आहेत, त्याचे ते काय करणार? त्यांनी संपूर्ण घर बदलले आहे. त्यांच्याकडे १२ खेळाडू आहेत त्याच्यात ६ गोलंदाजांचा समावेश आहे. त्यांच्याकडे भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, मार्को जॅनसेन, उमरान मलिक आणि टी नटराजन. अर्थात त्यांना आता वेगवान गोलंदाज खरेदी करायचे नाहीत."
भुवनेश्वर कुमार होणार कर्णधार?
सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीला फलंदाज आणि एका कर्णधारासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत. ते भुवनेश्वर कुमारला कर्णधारपद देऊ शकतात का? हे मी पाहण्यासाठी उत्सुक आहे. या संघाचा कर्णधार भुवनेश्वर कुमार किंवा एडन मार्करम असू शकतो. मला या संघात तिसरा कर्णधार दिसत नाही, असेही आकाश चोप्राने म्हटले.
हैदराबादने रिलीज केलेले खेळाडू -
केन विलियमसन, निकोलस पूरन, जगदीशा सुचिथ, प्रियाम गर्ग , रवीकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाळ, सुशांत मिश्रा, विष्णून विनोद.
कायम ठेवलेले खेळाडू - अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को येनसन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Sunrisers Hyderabad franchise has a balance of Rs 42 crore, so what will they do with it, asks Aakash Chopra
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.