IPL 2019 : हैदराबादचे दिल्लीपुढे 163 धावांचे आव्हान

दिल्लीकडून इशांत शर्मा आणि किमो पॉल यांनी यावेळी दोन विकेट्स मिळवल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 09:11 PM2019-05-08T21:11:19+5:302019-05-08T21:19:32+5:30

whatsapp join usJoin us
Sunrisers Hyderabad given 161 runs target to Delhi Capitals | IPL 2019 : हैदराबादचे दिल्लीपुढे 163 धावांचे आव्हान

IPL 2019 : हैदराबादचे दिल्लीपुढे 163 धावांचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, आयपीएल 2019 : मार्टिन गप्तील, मनीष पांडे आणि केन विल्यम्सन यांच्या दमदार खेळींच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादलादिल्ली कॅपिटल्सपुढे 161धावांचे आव्हान ठेवता आले. दिल्लीकडून किमो पॉलने यावेळी तीन विकेट्स मिळवल्या.


दिल्लीने नाणेफेक जिंकत हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळई वृद्धिमान साहाच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का बसला. साहाला आठ धावा करता आल्या. त्यानंतर मार्टिन गप्तील, मनीष पांडे आणि केन विल्यम्सन यांनी उपयुक्त खेळी साकारत संघाला शतक पूर्ण करून दिले. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.


वृद्धिमान साहाला पहिल्याच चेंडूवर दिले आऊट, तरी तो नाबाद ठरला, पाहा व्हिडीओ
दिल्ली-हैदराबाद यांच्यातील एलिमिनेटर सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर एक नाट्य पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादकडून ट्रेंट बोल्ट पहिले षटक टाकत होता, तर दिल्ली कॅपिटल्सचा वृद्धिमान साहा बॅटींग करत होता. यावेळी पंचांनी साहाला आऊट दिले, पण साहा त्यानंतरही खेळत होता.

बोल्टने पहिलाच चेंडू अचूक टाकला. हा चेंडू साहाच्या पॅडला लागल्याचे दिसत होते. दिल्लीच्या संघाने जोरदार अपील केली आणि पंचांनीही साहाला बाद असल्याचे सांगितले. त्यानंतर नाट्याला सुरुवात झाली. साहाने सलामीवीर मार्टिन गप्तीलशी चर्चा केली आणि त्यानंतर डीआएस घेतला. डीआरएसमध्ये बोल्टचा चेंडू साहाच्या बॅटला लागल्याचे दिसत होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी साहाला नाबाद ठरवले. त्यामुळे मैदानावरील पंचांनी पहिल्याच चेंडूवर बाद दिलेला साहा हा नाबाद ठरला.


दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज एलिमिनेटरचा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामान जो संघ जिंकेल, त्याला क्वालिफायर-2 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. पण जो संघ पराभूत होईल त्याचे आव्हान संपुष्टात येईल.

Web Title: Sunrisers Hyderabad given 161 runs target to Delhi Capitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.