Wade Run Out Video, IPL 2022 RR vs GT Live: गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या षटकात राजस्थानकडून संधी मिळालेल्या जेम्स नीशमला मॅथ्यू वेडने तीन चौकार मारत चांगली सुरूवात केली. पण दुसऱ्याच षटकात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरातला धक्का बसला. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना उत्कृष्ट फिल्डिंगच्या बळावर रासी वॅन डर डुसेनने मॅथ्यू वेडला चपळाईने धावचीत केले. पाहा व्हिडीओ-
दोन्ही संघातील महत्त्वाचे बदल
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) च्या संघाने ट्रेंट बोल्टला संघाबाहेर बसवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. त्याच्या जागी अष्टपैलू जेम्स नीशमला संघात स्थान देण्यात आले. गुजरात टायटन्सनेही संघात दोन महत्त्वाचे बदल केले. यश दयालला पदार्पणाची संधी देण्यात आली. दर्शन नळकांडेच्या जागी तो संघात आला. तसेच विजय शंकरला पुन्हा संघात स्थान मिळाले. त्याने साई सुदर्शनची जागा घेतली.
गुजरात टायटन्स: मॅथ्यू वेड (किपर), शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवातिया, राशिद खान, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, यश दयाल
राजस्थान रॉयल्स: जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (किपर, कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, शिमरॉन हेटमायर, जेम्स नीशम, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल