Suresh Raina, IPL 2022 ची सुरूवात २६ मार्चपासून होणार आहे. या स्पर्धेची फायनल २९ मे रोजी रंगणार आहे. तब्बल दोन महिने ही स्पर्धा खेळली जाणार असून या दोन महिन्याच्या कालावधीत सर्व खेळाडू बायोबबलमध्ये राहणार आहेत. अशा परिस्थितीत दीर्घ कालावधीसाठी बायो-बबलमध्ये राहण्याची भीती वाटत असल्याने Kolkata Knight Riders संघाच्या Alex Hales या खेळाडूने IPLमधून माघार घेतली. सुरूवातीला गुजरात टायटन्सच्या जेसन रॉयने हेच कारण देत माघार घेतली होती. या दोन्ही वेळा त्यांच्या जागी अनसोल्ड राहिलेल्या सुरेश रैनाला संधी मिळेल अशी चाहत्यांची आशा होती. पण ती आशा फोल ठरली. KKR ने Aaron Finch बदली खेळाडू म्हणून निवडलं.
Mr. IPL अशी ओळख असलेला सुरेश रैना यंदाच्या मेगालिलावात unsold राहिला. त्यानंतर गुजरात टायटन्स संघातून जेसन रॉयने माघार घेतली तेव्हा त्याच्या जागी सुरेश रैनाला संधी दिली दाईल असं बोललं जात होतं. पण त्यांनी अफगाणिस्तानच्या गुरबाजला संधी दिली. त्यानंतर कोलकाताच्या अलेक्स हेल्सने बायो बबलचं कारण पुढे माघार घेतली. त्यावेळीही सुरेश रैनाला IPL मध्ये संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण KKR ने ऑस्ट्रेलियन टी२० कर्णधार आरोन फिंचला बदली खेळाडू म्हणून संघात दाखल करून घेतलं आणि सुरेश रैनाची संधी पुन्हा एकदा हुकली.
आरोन फिंच हा IPL मध्ये सर्वाधिक ८ संघांकडून खेळला आहे.
आरोन फिंच हा आतापर्यंत IPL मध्ये आठ संघांकडून खेळला आहे. राजस्थान रॉयल्स (२०१०), दिल्ली डेअरडेविल्स (२०११-१२), पुणे वॉरियर्स (२०१३), हैदराबाद (२०१४), मुंबई इंडियन्स (२०१५), गुजरात लायन्स (२०१६-१७), किंग्स इलेव्हन पंजाब (२०१८), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (२०२०) अशा आठ संघांकडून तो खेळला आहे. आता तो २०२२ साली कोलकाता या नवव्या संघाकडून खेळणार आहे.