भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यांची मैत्री किती अतुट आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. 15 ऑगस्ट 2020 या तारखेला धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला अन् लगेच रैनानेही त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. सुरेश रैनानं नुकतंच त्याच्या आत्मचरित्राच्या पुस्तकाचं अनावरण केलं आणि त्यात त्यानं आयुष्यातील अनेक चढ-उतारांबद्दल लिहिलं आहे. या आत्मचरित्राच्या प्रमोशनसाठी रैनानं The Lallantop ला मुलाखत दिली आणि त्यात त्यानं त्याच्या लव्ह स्टोरीबद्दलही सांगितले.
सुरेश रैना प्रियांकाला ( आता त्याची पत्नी आहे) प्रपोज करण्यासाठी ऑस्ट्रेलियाहून 18 तासांचा प्रवास करून इंग्लंडला गेला होता. पण, त्यावेळी जर त्यानं कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मनधरणी केली नसती तर कदाचित आज प्रियांका रैनाची पत्नी नसती. जाणून घ्या नेमकं काय झालं ते.
रैनानं सांगितले की, " टीम इंडिया तेव्हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती आणि त्या दौऱ्यात आम्हाला 8 दिवसांचा ब्रेक मिळाला होता. त्या ब्रेकचा उपयोग करून प्रियांकाला प्रपोज करण्यासाठी इंग्लंडला जाण्याचं ठरवलं. त्याबाबत मी धोनीला सांगितले. तेव्हा धोनी म्हणाला विचार कर तुला नंतर दुसरी कुणी तरी मिळेल. पण मी धोनीचं मन वळवलं. माझ्याकडे ब्रिटनचा व्हिसा होता. मी बीसीसीआयची परवानगी घेतली. मी प्रियांकाला प्रपोज करण्यासाठी पर्थ ते दुबई 16 तास आणि नंतर दुबई ते इंग्लंड 12 तास विमान प्रवास केला.''
कोणत्याही मुलीला प्रपोज करणं अवघड
''त्यावेळी विमान वेळेवर मिळालं नसतं तर आजची कल्पना करवत नाही. खेळणं सोपं आहे, पण कोणत्याही मुलीला प्रपोज करणे अवघड. प्रपोज करताना प्लॅन बी वैगरे नसतो. त्यावेळी फक्त प्लॅन ए असतो आणि त्याचवर फोकस करावा लागतो," असेही रैनानं सांगितलं. सुरैश रैना आणि प्रियंकाचे 2015 साली लग्न झाले. त्यांना आता ग्रेसिया आणि रियो ही दोन मुलं आहेत.
Web Title: Suresh Raina and Priyanka Chaudhary Love Story: Know MS Dhoni Role in Raina's Marriage
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.