जगभरातील कोरोना रुग्णांची संख्य 1 कोटी 26 लाख 31,866 इतकी झाली आहे. त्यापैली 73 लाख 67,593 रुग्ण बरे झाले असून 5 लाख 62,921 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 8 लाख 22,674 इतका झाला असून त्यापैकी 5 लाख 16,308 रुग्ण बरे झाले आहेत, तर 22,152 रुणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे अजूनपर्यंत क्रिकेटला सुरुवात झालेली नाही. पण, काही खेळाडूंनी क्रिकेट सरावाला सुरुवात केली.
टीम इंडियाचा रिषभ पंत आणि फलंदाज सुरेश रैना यांनी फलंदाजीचा सराव केला. या दोघांनी सोबत सराव केला आणि एकत्र आईस बाथही घेतला. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरेश रैनानं सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात दोन्ही खेळाडू कसून सराव करताना पाहायला मिळत आहेत आणि रैना पंतला काही टिप्सही देत आहे. त्यानंतर दोघांनी एका पोर्टेबल स्वीमिंग पूलमध्ये बसून आईस बाथ केला. या पूलमध्ये बर्फ ठेवण्यात आले आहेत.
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्राच्या सुपुत्राला सलाम; ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ शेतात गाळतोय घाम!
पुढील महिन्यात सुरू होणार ट्वेंटी-20 लीग; शाहरुख खानच्या संघातून खेळणार प्रविण तांबे!
दिल्ली टू केनिया व्हाया मुंबई; भारताचा क्रिकेटपटू करणार केनियाच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण?
भारतीय क्रिकेटपटूची आई बनली 'कोरोना वॉरियर'; संकटकाळात करतेय 'बेस्ट' काम!