हैदराबाद - बंगळुरु संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम सुरेश रैनाने मोडला आहे. रैनाने आज झालेल्या सामन्यात 54 धावांची खेळी करत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आज रैनाने 47 वी धाव घेताच हा विक्रम आपल्या नावावर केला. राशिद खानच्या गोलंदाजीवर चौकार लगावत रैनाने विराट कोहलीला (4649 धावा) मागे टाकले. सध्या सुरेश रैनाच्या नावावर 4658 धावा आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये रैना प्रथम आणि कोहली दुसऱ्या स्थानावर आहेत.
चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात झालेल्य सामन्यात सुरेश रैनाने संयमी फंलदाजी केली. अनुभवी रैनाने आज संयमी फंलदाजी केली. रैनाने 43 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकांरासह 54 धावा केल्या. आयपीएलमध्ये रैनाने 165 सामन्यात 34.23 च्या सरासरीने 4656 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
सुरेश रैना - 4658 धावाविराट कोहली - 4649 धावारोहीत शर्मा - 4345 धावागौतम गंभीर - 4210 धावाडेव्हीड वॉर्नर - 4014 धावा