महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा आणि टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानंही आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2018मध्ये रैनानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 आणि 2015मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. रैनानं इस्टाग्रामवर पोस्ट लिहिली की,''धोनी तुझ्यासोबत खेळण्याचा आनंद निराळाच होता. त्यामुळे तू निवृत्ती घेतल्यानंतर मीही तुझ्या या प्रवासात येण्याचा निर्णय घेत आहे. टीम इंडिया धन्यवाद. जय हिंद.'' निवृत्तीनंतर आता सुरेश रैनाला समाजकार्यात सक्रीय व्हायचं आहे आणि त्यानं तशी इच्छा व्यक्त केली आहे.
एअरटेल ग्राहक आहात, मग ही बातमी वाचा... लवकरच तुम्हाला 1GBसाठी मोजावे लागू शकतात 100 रुपये
रैनानं 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे त त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे. त्यानं जम्मू-काश्मीर येथे क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी योगदान देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या राज्यातिल गरीब व ग्रामिण भागातील मुलांना क्रिकेट प्रशिक्षण देण्याची तयारी त्यानं दर्शवली आहे आणि त्यासाठी त्यानं राज्याचे डीजीपी दिलबाग सिंग यांना पत्र लिहिलं आहे.
33 वर्षीय रैनाला क्रिकेटला काही तरी द्यायचे आहे. रैना स्वतः काश्मीरी पंडित आहे आणि त्याचे वडील त्रिलोकचंद राज्यातील रैनवारी येथे राहणारे आहेत आणि त्याची आई हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील मुळ निवासी आहे. रैनानं पत्रात लिहिलं की,''मी 15 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सेवा केली आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग मी पुढील पीढीपर्यंत पोहोचवण्याचा माझा मानस आहे.''
जम्मू-काश्मीरच्या संघानं 1959-60मध्ये रणजी करंडक स्पर्धेत स्थान पटकावलं होतं, परंतु तेव्हापासून या संघाच्या वाट्याला संघर्षच आहे. परवेझ रसूलच्या नेतृत्वाखाली या संघाची कामगिरी सध्या उंचावत आहे. 2013-14मध्ये संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. पुढील मोसमात त्यांनी मुंबईला पराभवाचा धक्का दिला होता. 2019-20मध्ये त्यांनी बाद फेरीत प्रवेश केला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक : भारतीय खेळाडूनं केली पत्नी व आईची हत्या; मुलांना फोन करून सांगितली घटना
जेम्स अँडरसननं पाकिस्तानची जिरवली; तिसऱ्या कसोटीत भीमपराक्रमाची नोंद केली!
इंग्लंडकडून वस्त्रहरण; पावसानं वाचवली पाकिस्तानची इभ्रत!
जेम्स अँडरसनच्या विश्वविक्रमात भारतीय फलंदाजांचा 'मोठा' वाटा; जाणून घ्या कसा!