IPL 2023 : ३१ मार्चपासून भारतात सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या आगामी २०२३ हंगामासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी सुरू केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीही ( MS Dhoni) सध्या जोरदार सराव करत आहे. एवढेच नाही तर धोनी सरावाच्या वेळी लांब शॉट्सही मारत आहे. ज्याचे व्हिडिओ नुकतेच चेन्नई सुपर किंग्सने पोस्ट केले आहेत. दुसरीकडे धोनीचा हा शेवटचा आयपीएल सीझन असल्याचेही मानले जात आहे. ज्यावर सीएसकेकडून अनेक वर्षे खेळणाऱ्या सुरेश रैनाने ( Suresh Raina) महत्त्वाचे विधान केले आहे.
धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याच दिवशी धोनीचा चांगला मित्र आणि सहकारी सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर धोनी सतत आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. दुसरीकडे, रैना आता पूर्णपणे बाहेर आहे आणि कधी कधी समालोचन करतो, आजकाल तो लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीची मोहिनी पसरवत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा सामना ३१ मार्चला पहिल्या सामन्यात गेल्या वेळी आयपीएल चॅम्पियन संघ गुजरात टायटन्सशी होणार आहे.
दोहा येथे सुरू असलेल्या लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये खेळलेल्या रैनाने धोनीच्या शेवटच्या आयपीएल हंगामाविषयी सांगितले की, "माझ्या मते, धोनी पुढील वर्षी पुन्हा आयपीएल खेळताना दिसेल. कारण त्याचा फॉर्म आणि तो शानदार फलंदाजी करत आहे. या हंगामात तो कसा कामगिरी करतो यावर सर्व अवलंबून आहे. माझ्या मते, धोनीचा संघ CSK खूप मजबूत दिसत आहे. कारण त्यात ऋतुराज गायकवाड, डेव्हन कॉनवेसह सर्व युवा खेळाडू उपस्थित आहेत आणि यावेळी बेन स्टोक्स देखील खेळणार आहे. मी धोनीशी फोनवर बोलत राहतो आणि तो कसून सराव करत आहे.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"