Suresh Raina is BACK in IPL 2022 : सुरेश रैनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये सुरेश रैनावर एकाही संघाने बोली लावली नाही. अखेरच्या क्षणाला चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) त्याला पुन्हा संघात घेतील अशी आशा होती, परंतु तसे झाले नाही. Mr. IPL सुरेश रैनाला डावलल्यानं चाहते निराश झाले होते आणि त्यांनी CSK ला ट्रोलही केले. यंदाच्या आयपीएल २०२२ मध्ये तरी रैना खेळताना दिसणार नाही हे स्पष्ट झाले. पण, सुरेश रैना IPL 2022 त परतला आहे आणि एका नव्या अवतारात तो दिसणार आहे.
रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचा माजी उप कर्णधार आयपीएल २०२२त समालोचकाच्या भूमिकेत पदार्पण करणार आहे. यावेळी तो भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत क्रिकेट सामन्यांचे हिंदीत समालोचन करणार आहे. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार सुरेश रैना Commentory Box मध्ये दिसणार आहेत. IPL 2022 Auction मध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर सुरेश रैनाचे नाव गुजरात टायटन्स संघासोबत जोडले जात होते. पण, त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले.
इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन सध्या न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत समालोचन करत असल्याने ते आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार नाही. पण, केव्हीन पीटरसन, मार्क निकोलस, इयान बिशॉप, डॅनी मॉरिसन, सिमोन डॉल, मिचेल स्लॅटर हे समालोचन करताना दिसतील.
हिंदी समालोचक - आकाश चोप्रा, इरफान पठाण, गौतम गंभीर, पार्थिव पटेल, निखिल चोप्रा, तान्या पुरोहित, किरण मोरे, जतिन सप्रू, सुरेश सुंदरम, रवी शास्त्री व सुरेश रैना
मराठी समालोचक - कुणाल दाते, प्रसन्न संत, चैतन्य संत, स्नेहल प्रधान, संदीप पाटील