Breaking News : IPL 2022 Mega Auction : Suresh Raina आयपीएल २०२२त नाही खेळणार, अंतिम यादीतही CSK ने फिरवली पाठ!

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates - चेन्नई सुपर किंग्सने  ( Chennai Super kings) रिलीज केल्यानंतर ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 07:24 PM2022-02-13T19:24:57+5:302022-02-13T19:25:20+5:30

whatsapp join usJoin us
Suresh Raina not part of the last list in the auction which means that the former CSK cricketer won't be part of IPL2022 as a player | Breaking News : IPL 2022 Mega Auction : Suresh Raina आयपीएल २०२२त नाही खेळणार, अंतिम यादीतही CSK ने फिरवली पाठ!

Breaking News : IPL 2022 Mega Auction : Suresh Raina आयपीएल २०२२त नाही खेळणार, अंतिम यादीतही CSK ने फिरवली पाठ!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates - चेन्नई सुपर किंग्सने  ( Chennai Super kings) रिलीज केल्यानंतर सुरेश रैनाला ( Suresh Raina) कोणता संघ ताफ्यात घेणार याची उत्सुकता सर्वांनाच होती. पण, २ कोटी मुळ किंमत असलेल्या रैनासाठी कोणत्याच फ्रँचायझीने बोली लावली नाही. पण, तरीही रैनाला अंतिम यादीत सहभागी करून घेत CSK मुळ किमतीत का होईना आपल्या ताफ्यात घेईल, असे वाटले होते. पण, तीही आशा मावळली. १० फ्रँचायझींनी जाहीर केलेल्या ६९ खेळाडूंच्या दुसऱ्या acceleration round मध्ये रैनाचे नाव नव्हते. ( No Suresh Raina in the 69 names of the 2nd acceleration round) 

आयपीएलच्या २०२० पर्वात रैना आणि CSK चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या वादाच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, त्यावर रैनानं मौन सोडताना अफवा असल्याचे सांगितले. त्यानंतर CSKने आयपीएल २०२२साठी रैनाला रिलीज केले. सुरेश रैना व धोनी यांची घट्ट मैत्रीही जगाने पाहिली आहे. धोनीने २०२०मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला तेव्हा लगेचच रैनाने निवृत्ती जाहीर केली होती. टी-२०, वन डे आणि कसोटी अशा तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा भारताचा पहिला फलंदाज असलेल्या रैनाला २०२१च्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरीही करता आली नाही.

रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. एकूण आयपीएलमध्ये २०५ सामन्यांत ३२.५१च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक व ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. शिवाय त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत. रैनाने ५०६ चौकार व २०३ षटकार खेचले आहेत आणि १०८ झेलही टिपले आहेत.

Web Title: Suresh Raina not part of the last list in the auction which means that the former CSK cricketer won't be part of IPL2022 as a player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.