T20 World Cup 2024 - आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) याने टीम इंडियाच्या संभाव्य १५ खेळाडूंची निवड केली आहे. सुरेश रैनाने निवडलेला हा संघ संतुलित वाटतोय, परंतु तोही हार्दिक पांड्या व शिवम दुबे या दोघांच्या निवडीमध्ये अडकला आहे. पण, त्याने गोलंदाजी विभागात अनपेक्षित निवड केल्याने सर्वांना आश्चर्य वाटले आहे.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची गटवारी अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
भारतीय संघाचे वेळापत्रक
५ जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क९ जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क१२ जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क१५ जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
सुरेश रैनाने निवडलेल्या संघात रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल ही जोडी सलामीला आहे. त्यानंतर रैनाने विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांची निवड केली आहे. पाचव्या क्रमांकासाठी रिंकू सिंगची निवड करण्याचा निर्णय रैनाने घेतला, परंतु KKR च्या फलंदाजाला आयपीएल २०२४ मध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. यष्टिरक्षक-फलंदाजांच्या शर्यतीत संजू सॅमसन व रिषभ पंत यांची निवड रैनाने केलीय. अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक, शिवम यांच्यापैकी एक आणि रवींद्र जडेजा असा पर्यात त्याने ठेवला आहे. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल यांच्यासोबत हर्षित राणाला त्याने निवडले आहे.