जुलै 2019 पासून महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या सत्रातील कामगिरीच्या जोरावर धोनी टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज होता, परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएलवरही अनिश्चिततेचं सावट आलं आहे. त्यामुळे धोनीचं टीम इंडियातील पुनरागमनही लांबणीवर पडलं आहे. अशात पुन्हा एकदा त्याच्या निवृत्तीच्या चर्चा जोर पकडू लागल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू सुरेश रैना यांनी त्यांच्या चर्चासत्रात कॅप्टन कूल धोनीच्या निवृत्तीबाबत मोठं विधान केलं.
सानिया मिर्झा ट्राऊझर? सोशल मीडियावर होतेय व्हायरल; Video पाहून व्हाल लोटपोट
वीरेंद्र सेहवागच्या प्रश्नांवर Sunny Leoneची जोरदार फटकेबाजी; दोघांनी केलेली एकत्रित कॉमेंट्री
धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
धोनीच्या निवृत्तीबद्दल रैना म्हणाला,'' चेन्नई सुपर किंग्सच्या सराव शिबीरात मी त्याला जोरदार फटकेबाजी करताना पाहिलं. भविष्याबाबत त्याचं त्यालाच माहिती, परंतु त्यात अजूनही क्रिकेट शिल्लक आहे. आता लॉकडाऊन आहे आणि धोनीच्या डोक्यात काय चाललंय, हे मलाही माहित नाही.''
बांगलादेशच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, छातीत दुखू लागल्यानं डॉक्टरांकडे धाव
कसा असेल MI-CSKचा एकत्रित संघ?; रोहित शर्मा, सुरेश रैनानं निवडले खेळाडू
रोहितनंही धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनासाठी बॅटींग केली. तो म्हणाला,''त्यानं अजून खेळायला हवं. आशा करतो की तो पुन्हा खेळायला सुरूवात करेल. पण, त्याच्या डोक्यातील विचार तोच जाणे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल
... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या क्षमतेवर Yuvraj Singhचा सवाल; त्या दर्जाचे क्रिकेट ते खेळलेत का?
'माझ्या घरावर दगडफेक करण्यात आली होती'; तो प्रसंग आठवून युवराज सिंग भावुक
Web Title: Suresh Raina, Rohit Sharma discuss MS Dhoni's future with Team India svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.