नवी दिल्ली : शुक्रवारी कोची येथे झालेल्या आयपीएल 2023च्या मिनी लिलावात विदेशी खेळाडूंनी मोठा गल्ला कमावला. खरं तर इंग्लिश खेळाडूंनी आयपीएलचा मिनी लिलाव गाजवला. मात्र, काही अनकॅप्ड क्रिकेटपटूंनी देखील फ्रँचायझींना आकर्षित केले आणि मोठी रक्कम मिळवली. अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरैश रैनाने अनकॅप्ड खेळाडूंना मोलाचा सल्ला दिला आहे.
गतविजेत्या गुजरात टायटन्सने वेगवान गोलंदाज शिवम मावीला ६ कोटी रूपये देऊन खरेदी केले. लक्षणीय बाब म्हणजे यंदाच्या लिलावातील तो सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. तसेच गुजरातच्या फ्रँचायझीने विकेटकीपर-फलंदाज के.एस.ला 1.2 कोटी आणि गुजरातचा क्रिकेटर उर्विल पटेलला 20 लाख रुपयांना खरेदी केले.
सुरेश रैनाने दिला मोलाचा सल्ला बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने बंगाल तसेच भारत अ संघात शनदार कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याला आयपीएल लिलावात 5.5 कोटी रूपये मिळाले आहेत. भारत आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू सुरेश रैनाने अनेक अनकॅप्ड खेळाडूंना आयपीएल लिलावात चांगले पैसे मिळत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे म्हटले. त्यांनी या पैशाचा वापर क्रिकेटच्या विकासासाठी स्वतःमध्ये गुंतवणूक म्हणून करावा असा सल्लाही रैनाने दिला.
रैनाने मास्टरकार्ड मॅच सेंटर लाइव्हवर जिओ सिनेमाला सांगितले की, हे खेळाडू पुढे जाऊन भारतासाठी खेळू शकतात, त्यांच्या कुटुंबासाठी घर खरेदी करू शकतात आणि त्यांच्या शरीराची काळजी घेण्यासाठी पैसे खर्च करू शकतात.
जम्मू एक्सप्रेस SRHच्या ताफ्यातमूळचा जम्मू-काश्मीरचा असलेला अष्टपैलू खेळाडू विव्रत शर्माने या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. तो आता आगामी आयपीएल हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादच्या संघाचा हिस्सा असणार आहे. त्याला हैदराबादच्या फ्रँचायझीने 2.6 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले. लक्षणीय बाब म्हणजे मुकेश कुमार त्याचे सहकारी उमरान मलिक आणि अब्दुल समद यांच्यासोबत हैदराबादच्या ताफ्यात सामील झाला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"