भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यातील पराभव, २०१९च्या वन डे वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत हार अन् २०२१च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभव, यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका होत आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेल्या सुरेश रैनानंही विराट कोहलीच्या कर्णधारपदावर भाष्य केले आहे. विराट हा भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. परंतु त्याच्या यशाबद्दल भाष्य करणे हे घाईचे होईल, कोहलीला आणखी वेळ द्यायला हवा, असेही रैना म्हणाला.
इंग्लंडच्या चाहत्यांना पराभव पचवणे झाले कठीण, इटलीच्या फॅन्सना बेदम मारले, Video
''विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. माझ्यामते तो अव्वल क्रमांकाचा कर्णधारही आहे. त्याचे रिकॉर्ड ते सिद्ध करतात. तुम्ही आयसीसी ट्रॉफीबद्दल चर्चा करताय, परंतु त्यानं आयपीएलचे जेतेपदही पटकावलेले नाही. त्याला आणखी वेळ द्यायला हवा, असं मला वाटतं. एकामागोमाग २-३ वर्ल्ड कप होणार आहेत. आयसीसी स्पर्धेच्या फायनलपर्यंत पोहोचणेही सोपी गोष्ट नाही. काहीवेळा काही गोष्टी चुकतात,''असे रैना म्हणाला.
न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताला ८ विकेट्सनं हार पत्करावी लागली होती. त्यावरून रैनानं हे भाष्य केलं महेंद्रसिंग धोनीनं २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, २०११चा वन डे वर्ल्ड कप आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या तीन प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली आयसीसी स्पर्धांमध्ये येत असलेल्या अपयशामुळे टीम इंडियाला चोकर्स असे म्हटले जात आहे.
IPL 2022मध्ये जर महेंद्रसिंग धोनी खेळणार नसेल, तर मी पण खेळणार नाही; सुरेश रैना
त्यावरही रैना म्हणाला,''आम्ही १९८३चा वर्ल्ड कप, २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०११चा वर्ल्ड कप जिंकला आहे, त्यामुळे आम्ही चोकर्स नाही. खेळाडू विजयासाठी अथक परिश्रम घेतात, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता तीन वर्ल्ड कप होणार आहेत आणि मला नाही वाटत कोण त्यांना चोकर्स म्हणेल.''