Suresh Raina’s Father passed away : भारतीय संघाकडून तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा एकमेव खेळाडू सुरेश रैना याच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. त्रिलोकचंद रैना हे बऱ्याच काळापासून कॅन्सरशी संघर्ष करत होते. डिसेंबरमध्ये त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर सुरेश रैना गाजियाबाद येथील आपल्या निवासस्थानी वडिलांसोबतच होता. आजारी असलेल्या त्रिलोकचंद रैना यांनी रविवारी गाजियाबादच्या राजनगर येथे शेवटचा श्वास घेतला.
त्रिलोकचंद हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. त्यांनी ऑर्डिनन्स फॅक्टरीत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांचे मुळ गाव हे जम्मू-काश्मीर येथील रैनावारी हे आहे. १९९० मध्ये काश्मीरी पंडितांच्या हत्येनंतर त्रिलोकचंद यांनी गाव सोडले. ते गाजियाबाद येथील मुरादनगर येथे आले.
रैनानं 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे त त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.
Web Title: Suresh Raina’s Father who was sick from long time passed away today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.