कुस्तीपटू सुशीलकुमारनेही विवाहसोहळ्याला उपस्थिती लावली.
रैनाला शुभेच्छा देण्यासाठी आलेला डॅरेन ब्राव्हो.
इरफान पठाणही लग्नासाठी आवर्जून उपस्थित होता.
अभिनेता अनुपम खेर यांनीही विवाहसोहळ्याला हजेरी लावत सुरेश रैना व प्रियांकाला शुभेच्छा दिल्या.
रैना आणि महेंद्रसिंग धोनीची मैत्री जगजाहीर आहे. आपल्या मित्राच्या आयुष्यातील या महत्वाच्या प्रसंगी धोनी त्याची पत्नी साक्षीसह उपस्थित होता.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही रैना व त्याच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या.
या विवाहसोहळ्यासाठी दोघांचे नातेवाईक मित्रमैत्रिणींसह भारतीय संघातील रैनाचे साथीदार आणि अनेक महत्वाच्या व्यक्ती हजर होत्या. त्यांनी नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.
टीम इंडियाचा क्रिकेटपटू सुरेश रैना काल मेरठच्या प्रियांका चौधरीशी विवाहबद्ध झाला. नवरदेव सुरेश रैनाने सोनेरी रंगाचा देखणा पेहराव केला होता तर त्याची पत्नी प्रियंकाने लाल रंगाची भरजरी साडी परिधान केली होती.