चेन्नई सुपर किग्संचा ( CSK) उपकर्णधार सुरेश रैनानं शनिवारी अचानक दुबई सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. रैनाच्या या निर्णयानं सर्वांना धक्काच बसला. वैयक्तिक कारणास्तव रैनानं ही माघार घेतली असून तो यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) खेळणार नसल्याचे CSKचे सीईओ केएस विश्वनाथन यांनी सांगितले. या कठीण काळात CSK त्याच्या व कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचेही ते म्हणाले. पण, रैनानं नेमकी का माघार घेतली हे स्पष्ट होत नव्हते.
नक्की किती जणांना कोरोना झाला?; बीसीसीआयनं सांगितलेला आकडा जाणून बसेल धक्का
'जागरण.कॉम'ने दिलेल्या माहितीनुसार रैनाच्या काकांचे पठाणकोट येथील थरीयाल गावात झालेल्या हल्ल्यात निधन झाले असून आत्याची प्रकृती चिंताजनक आहे, त्यामुळे रैना मायदेशात परतला. 19 ऑगस्टला रैनाचे नातेवाईक घराच्या टेरेसवर झोपले असताना मध्यरात्री त्यांच्यावर अज्ञात इसमांनी प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला. रैनाच्या वडीलांची बहिण आशा देवी यांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे त्याचे 58 वर्षीय काका अशोक कुमार यांचे निधन झाले. रैनाचे आत्ये भाऊ कौशल कुमार ( 32 वर्ष) आणि अपीन कुमार ( 24 वर्ष) यांनाही दुखापत झाली आहे.
CSKनं काय ट्विट केलं?
चेन्नई सुपर किंग्सनं शनिवारी ट्विटवर पोस्ट करून माहिती दिली. ''सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार नाही. रैना आणि त्याच्या कुटुंबीयांना चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण पाठींबा आहे,''असे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी सांगितले.
नुकतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती
सुरेश रैनानं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर तो आयपीएलमध्ये दमदार कामगिरीसाठी सज्ज होता. 2018मध्ये रैनानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 आणि 2015मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. रैनानं 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे त त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्स संघातील पुणेकर खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह
IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक धक्का; सुरेश रैनानं घेतली माघार, मायदेशी परतला
IPL 2020 : CSKचा कोरोना पॉझिटिव्ह गोलंदाज कोण ते समजलं; सुरेश रैनासह आलेला इतरांच्या संपर्कात
IPL 2020 : विमानतळावरील 'झप्पी' CSKच्या खेळाडूंना महागात पडली? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल