Cheteshwar Pujara Century Surrey vs Sussex : इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या चेतेश्वर पुजारा भलत्याच फॉर्मात आल्याचे पाहायला मिळतय... प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर पुजारा आता Royal London One-Day Cup स्पर्धेत धुमाकूळ घालतोय. ससेक्स क्लबकडून खेळणाऱ्या पुजाराने आज सरे क्लबच्या गोलंदाजांना इंगा दाखवला अन् स्पर्धेतील सलग दुसऱ्या शतकाची नोंद केली.
वॉर्विकशायर क्लबविरुद्धच्या सामन्यात संघाला विजयासाठी ३११ धावा करायच्या असताना पुजाराने आक्रमक खेळी केली होती. त्याने एका षटकात २२ धावा चोपल्या आणि ७९ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०७ धावा केल्या होत्या. पण, ससेक्सला ४ धावांनी हार मानावी लागली. आज प्रथम फलंदाजी करताना सरेच्या गोलंदाजांचा पुजारा व टॉम क्लार्क यांनी समाचार घेतला. या दोघांनीही शतक झळकावली.
हॅरीसन वॉर्ड ( ५) व अली ओर ( ४) हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर पुजारा व क्लार्क यांनी डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २०५ धावांची भागीदारी केली. क्लार्क १०६ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने १०४ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुजाराने १०४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने शतक पूर्ण केले. पुजाराचे यंदाच्या इंग्लिश सत्रातील हे सातवे शतक ठरले. त्याने कौंटी क्रिकेटमध्ये ५ व आता वन डे क्रिकेटमध्ये दोन शतक झळकावली आहेत.
शतक पूर्ण झाल्यानंतर पुजाराने गिअर बदलला आणि धावांची गती वाढवली. पुढील ९ चेंडूंत त्याने ६ चौकार व २ षटकार खेचले. ४२ षटकापर्यंत ससेक्सच्या ३ बाद २८९ धावा झाल्या होत्या आणि पुजारा ११५ चेडूंत १४ चौकार व ४ षटकारांसह १४० धावांवर खेळत होता.
KR">pic.twitter.com/e3aWZNu0KR— Sussex Cricket (@SussexCCC)
August 14, 2022Web Title: Surrey vs Sussex : Back to Back hundred for Sussex Captain Cheteshwar Pujara, complet century in 104 ball with 9 fours and 2 sixes, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.