लंडन : इंग्लंडच्या ट्वेंटी-20 क्रिकेट इतिहासात सर्वात कमी धावसंख्येची नोंद शुक्रवारी झाली. सरे आणि ग्लॅमोर्गन संघाच्या या लढतीत ग्लॅमोर्गनचा संपूर्ण संघ अवघ्या 44 धावांत माघारी परतला. याआधी हा नकोसा विक्रम नॉर्दन सीसीनं ( सर्वबाद 47) डुर्हम क्रिकेट संघाविरुद्ध 2011साली नोंदवला होता. इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातील सदस्य असलेल्या टॉम कुरनने हॅटट्रिक नोंदवून सरेच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यानं 2 षटकांत 3 धावांत 3 विकेट्स घेतल्या.
141 धावांचा पाठलाग करताना ग्लॅमोर्गनला दुसऱ्याच षटकात कुरनने तीन धक्के दिले. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही तिसरी सर्वात निचांक धावसंख्या ठरली. झारखंडविरुद्धच्या सामन्यात 2009मध्ये त्रिपुराचा संपूर्ण संघ 30 धावांत माघारी परतला होता, तर श्रीलंकेने 2014मध्ये नेदरलँड्सचा डाव 39 धावांत गुंडाळला होता. टॉम कुरनची हॅटट्रिक
दरम्यान सामना सुरु असताना मैदानावर लांडग्यानं धाव घेतल्यानं सर्वांची पळापळ झाली. लांडगा आला रे आला