इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) १३व्या पर्वात मुंबई इंडियन्सन जेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सचे हे पाचवे आयपीएल जेतेपद ठरले. मुंबईच्या या विजयात सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या दमदार कामगिरीनंतरही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या ट्वेंटी-20 संघात त्याचे नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्य वाटले. टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघात सूर्यकुमार असायला हवा, असे मत सर्वांनी व्यक्त केले. दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांनी सूर्यकुमारला धीर सोडू नको असा सल्ला दिला. त्यांचा हाच सल्ला ऐकून सूर्यकुमारनं मंगळवारी ट्वेंटी-20त शतकी खेळी केली.
मुंबई इंडियन्ससाठी त्यानं १३व्या पर्वात ४ अर्धशतकांसह ४८० धावा केल्या होत्या. तत्पूर्वी २०१९ व २०१८च्या मोसमात अनुक्रमे ४२४ व ५१२ धावा त्यानं चोपल्या. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशननं ट्वेंटी-20 स्पर्धा भरवली आहे. त्यात टीम बी संघाचा कर्णधार सूर्यकुमारनं पहिल्या सामन्यात ३१ चेंडूंत नाबाद ५९ धावा केल्या होत्या. मंगळवारी त्यानं टीम डी विरुद्ध आणखी एक वादळी खेळी केली. त्यानं ४९ चेंडूंत १० चौकार व ९ षटकांरासह नाबाद १२३ धावा केल्या. १२३ धावांवर तो रिटायर्ड हर्ट झाला. डी संघाचे प्रतिनिधिव्त करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरच्या ( Arjun Tendulkar) एका षटकात सूर्यकुमारनं ६, ४, २, ४, ४, १ अशा २१ धावा चोपल्या. अर्जुननं ४ षटकांत ३३ धावा देत १ विकेट घेतली.
Web Title: Surya Kumar Yadav scored 123*, samshed 21 runs off Arjun Tendulkar's single over in the practice match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.