IND vs AFG T20 Series (Marathi News) : सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे ११ जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघात नसतील. ऋतुराज गायकवाडही बोटाच्या दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. तो इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिल्या भागालाही मुकण्याची शक्यता आहे.
रविवारी संध्याकाळी अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघाची निवड केली जाईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळतील का, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर रोहित किंवा कोहली दोघांनीही आंतरराष्ट्री ट्वेंटी-२० मॅच खेळलेले नाही. ESPN ने दिलेल्या वृत्तानुसार सूर्यकुमार आणि हार्दिक दोघेही IPL 2024 मधून पुन्हा अॅक्शनमध्ये दिसतील. डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमारला जोहान्सबर्गमधील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षण करताना घोट्याला दुखापत झाली. नुकतीच त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो काही महिन्यांत पुन्हा प्रशिक्षणात परतण्याची अपेक्षा आहे.
IPL नंतर लगेचच १ जूनपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी अफगाणिस्तान मालिका ही भारताची शेवटची द्विपक्षीय ट्वेंटी-२० मालिका आहे. त्याआधीच निवड समितीने त्यांचे पसंतीचे १५ खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असावेत, ज्यात हार्दिकचा समावेश आहे, जो नोव्हेंबरमध्ये पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या साखळी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त होऊन वन डे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मधील BCCI वैद्यकीय कर्मचार्यांनी त्वरीत बरे होण्याचा अंदाज व्यक्त केला असताना, हार्दिकने त्याचे पुनर्वसन सुरूच ठेवले आहे.
IND vs AFG TimeTable
११ जानेवारी - मोहाली, सायंकाळी ७ वाजल्यापासून१४ जानेवारी - इंदौर, सायंकाळी ७ वाजल्यापासून१७ जानेवारी - बंगळुरू, सायंकाळी ७ वाजल्यापासून