Rahul Dravid "सूर्यकुमारने लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नाही...", राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी 

rahul dravid and suryakumar yadav: भारतीय संघाने शनिवारी झालेल्या अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून पाहुण्या श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 11:02 AM2023-01-08T11:02:26+5:302023-01-08T11:03:04+5:30

whatsapp join usJoin us
Suryakumar never saw my batting as a child, Suryakumar Yadav and Rahul Dravid's funny interaction goes viral, watch video  | Rahul Dravid "सूर्यकुमारने लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नाही...", राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी 

Rahul Dravid "सूर्यकुमारने लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नाही...", राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाने शनिवारी झालेल्या अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून पाहुण्या श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना श्रीलंकेने जिंकला होता. मात्र, अखेरच्या सामन्यात विजय मिळवून हार्दिक सेनेने विजयरथ कायम ठेवला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या 'यंग ब्रिगेड'ने तिसऱ्या आणि अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला 91 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आणि मालिका 2-1 ने जिंकली.

सूर्यकुमार यादवने केलेली 112 धावांची नाबाद खेळी आणि त्याला भारतीय गोलंदाजांची मिळाली शिस्तबद्ध साथ यांच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेला पराभूत केले. भारतात श्रीलंकेने आतापर्यंत कधीही ट्वेंटी-20 मालिका जिंकलेली नाही, त्यामुळे हार्दिकच्या नव्या दमाच्या संघाने ही परंपरा कायम ठेवत भारताचा विजय निश्चित केला.

 राहुल द्रविड यांनी 'सूर्या'ची घेतली फिरकी 
दरम्यान, मालिका खिशात घातल्यानंतर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सूर्यकुमार यादवशी खास संवाद साधला, ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. BCCIने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये द्रविड म्हणतात की, "येथे माझ्यासोबत युवा खेळाडू आहे ज्याने लहानपणी मोठे होते असताना माझी फलंदाजी पाहिली नाही. पण, मला आशा आहे की तू तसे केले नाही", यावर हास्यास्पद प्रतिक्रिया देताना सूर्याने म्हटले, "हो मी केले आहे." नंतर दोघांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळते. 

द्रविड यांनी सूर्याचे कौतुक करताना म्हटले, "सूर्या, तू ज्या फॉर्ममध्ये आहेस. कारण प्रत्येक वेळी मला वाटते की मी यापेक्षा चांगली ट्वेंटी-20 खेळी पाहिली नाही. तू नेहमी आम्हाला काहीतरी वेगळे दाखवत असतोस. मागील वर्षभरात तू खेळलेल्या डावांपैकी सर्वोत्तम खेळी पाहण्याचा मला बहुमान मिळाला आहे. तू एक किंवा दोन सर्वोत्तम खेळी निवडू शकतोस का?". 

'सूर्या'चं उत्तरानं जिंकली मनं  
द्रविड यांनी विचारलेल्या प्रश्नांना सूर्याने देखील दिलखुलासपणे उत्तर दिले. "मी सर्व कठीण परिस्थितीत फलंदाजीचा आनंद लुटला. मी एकही डाव निवडू शकत नाही. खरं तर एक खेळी निवडणे कठीण आहे, मी फक्त स्वतःचा आनंद लुटला. मी मागील वर्षी जे काही केले होते तेच मी करत आहे. मी यापूर्वीही सांगितले आहे. तसेच मी फलंदाजीला जातो तेव्हा मी फक्त सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो आणि आनंद घेतो, शक्य तितका स्वत:ला व्यक्त करतो. अशा परिस्थितीत प्रतिस्पर्धी संघ सामना आपल्या हातातून घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मी तो पुढे नेतो. जर हे काम माझ्यासाठी आणि संघासाठी चांगले असेल तर मी आनंदी आहे."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Suryakumar never saw my batting as a child, Suryakumar Yadav and Rahul Dravid's funny interaction goes viral, watch video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.