BCCI Warning Suryakumar Yadav, IND vs SL T20 Series: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली. टी२० मालिकेतून सूर्यकुमार यादवला भारताच्या T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. रोहित शर्मा कर्णधार असताना हार्दिक पांड्या उपकर्णधार होता. त्यामुळे रोहितच्या निवृत्तीनंतर हार्दिक पांड्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल असे बोलले जात होते. पण अखेर सूर्यकुमारचे नाव टी२० कर्णधार म्हणून जाहीर झाले. बीसीसीआयने त्याच्या विश्वास दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही काही काळ त्याला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. मात्र यावेळी त्याला दीर्घकाळ संघाचा कर्णधार बनवण्याच्या उद्देशाने ही जबाबदारी देण्यात आली आहे. पण या जबाबदारी सोबतच सूर्याला बीसीसीआयकडून एक महत्त्वाचा इशाराही मिळाला आहे.
बीसीसीआयचा सूर्याला इशारा
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टी२० मध्ये कर्णधाराचा शोध सुरू आहे. हार्दिक पांड्या हा या पदासाठी सर्वात मोठा दावेदार होता, मात्र आता सूर्यकुमार यादवने ही शर्यत जिंकली आहे. २०२६च्या टी२० विश्वचषकापर्यंत तो संघाचे नेतृत्व करणार असल्याचे वृत्त आहे. त्यासोबतच काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी निवड समितीच्या अपेक्षांची पूर्तता करत नसेल, तर त्याला कधीही कर्णधारपदावरून दूर केले जाऊ शकते असा इशारा देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची आतापर्यंतची कामगिरी
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ७ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. या कालावधीत भारतीय संघाने ५ सामने जिंकले. तर २ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे त्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांविरुद्ध संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे या परिस्थितीत त्याची आकडेवारी खूपच उत्कृष्ट मानली जाऊ शकते. भविष्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची बीसीसीआयला अपेक्षा आहे, असे त्याला स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी२० संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज
Web Title: Suryakumar Yadav becomes T20 captain of Team India on Sri Lanka Tour over Hardik Pandya but gets warning from BCCI for good performance IND vs SL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.