MI vs GT, IPL 2023 : सूर्यकुमार यादवने आयपीएल कारकिर्दीतले पहिले शतक झळकावले आहे. मुंबई इंडियन्सच्या या स्टार फलंदाजाने गुजरात टायटन्सविरुद्ध इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून 103 धावांचा टप्पा गाठला. सूर्याने अवघ्या 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याचा रनांच्या जोरावर मुंबईने 5 विकेट गमावून 218 धावा केल्या. सूर्याचे गेल्या वर्षभरातील टी-20 क्रिकेटमधील चौथे शतक आहे. आजच्या शतकासोबत सूर्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
वानखेडे स्टेडियमवर सातत्याने शानदार फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा मोठा पराक्रम केला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी धडाकेबाज सुरुवात केल्यानंतर सूर्यकुमार यादवने सातव्या षटकात जबाबदारी स्वीकारली आणि आपल्याच खास शैलीत गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली.
शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला
सूर्याने धावांचा वेग कमी होऊ दिला नाही आणि अवघ्या 32 चेंडूत या मोसमातील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. यानंतरही सूर्यकुमारच्या बॅटचे आक्रमण सुरूच होते. एका क्षणी मुंबईची धावसंख्या 200 पेक्षा कमी होत असल्याचे दिसत होते, मात्र शेवटच्या 3 षटकांत सूर्याच्या बॅटने अशी आगपाखड केली की, मुंबईने 200चा टप्पा पार केला. शेवटच्या षटकात सूर्याला शतक पूर्ण करण्यासाठी 13 धावांची गरज होती. त्याने अल्झारी जोसेफचा शेवटचा चेंडू मिडविकेटवर षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले.
सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरीचे
सूर्याने हे शानदार शतक अवघ्या 49 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 6 षटकारांसह पूर्ण केले. आयपीएल 2023 च्या मोसमातील हे पहिलेच शतक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2011 मध्ये मुंबई इंडियन्सकडून सचिन तेंडुलकरने याच मैदानात शतक झळकावले होते. सचिनच्या शतकानंतर पहिल्यांदाच मुंबईच्या फलंदाजाने वानखेडेवर शतक झळकावले आहे.
Web Title: Suryakumar Yadav Century: After Sachin Tendulkar, Suryakumar; Scored a century at Wankhede
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.