Join us  

RSA vs IND : रोहितसह विराटला मागे टाकत सूर्या भाऊला टॉपर होण्याची संधी; इथं पाहा रेकॉर्ड

सूर्यकुमारच्या निशाण्यावर असेल हा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 3:46 PM

Open in App

सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ४ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी  दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली आहे. सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाने आतापर्यंत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. पण दक्षिण आफ्रिकेच्या मैदानातील लढाई ही वाटते तेवढी सोपी नसेल. त्यामुळे इथं त्याच्या कॅप्टन्सीचा खरा कस लागणार आहे.

कॅप्टन्सीसह  फलंदाजीतील धाक दाखवत खास रेकॉर्ड सेट करण्याची संधी

तो कॅप्टन्सीची कशी छाप सोडतोय ते पाहण्याजोगे असेलच. याशिवाय या मालिकेत सूर्यकुमार यादवला फलंदाजीत मोठा डाव साधण्याचीही संधी आहे. दमदार फलंदाजीच्या जोरावर तो रोहित शर्मा आणि कोहली यांना मागे टाकत नवा रेकॉर्ड सेट करू शकतो. जाणून घेऊयात सूर्याला खुणावत असलेल्या खास रेकॉर्डसंदर्भातील माहिती

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सध्याच्या घडीला रोहित शर्माच्या नावे आहे. टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितच्या खात्यात ४२९ धावा जमा आहेत. त्याच्यापाठोपाठ या यादीत विराट कोहलीचा नंबर लागतो. कोहलीन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३९४ धावा काढल्या आहेत. या दोघांनी आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

सूर्य कुमार यादव एका डावात हा डाव साधणार की,... 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानावर आहे. ७ सामन्यात त्याने  ३४६ धावा केल्या आहेत. यात एका शतकासह ४ अर्धशतकांचा समावेश आहे. चार सामन्यांच्या मालिकेत ८४ धावा करताच सूर्या या यादीत टॉपला पोहचेन. या धावा तो एका डावात करणार की, त्यासाठी मालिकेतील शेवटच्या सामन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार ते पाहण्याजोगे असेल.

  

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवरोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघद. आफ्रिका