Join us  

ICC T20I Ranking : सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या Babar Azamची जिरवली; हार्दिक पांड्यानेही मोठी प्रगती केली

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला, परंतु लोकेश राहुल, सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या यांची कामगिरी उल्लेखनीय झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 2:13 PM

Open in App

ICC T20I Ranking : भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याने आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला, परंतु लोकेश राहुल, सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या यांची कामगिरी उल्लेखनीय झाली. त्याचा फायदा आज झालेल्या आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत झालेला दिसतोय. 

पहिला हाफ उत्तम गेला, पण तीन चुकांमुळे भारताने सामना गमावला; Rohit Sharma ही तेच म्हणाला...

सूर्यकुमारने  मोहाली ट्वेंटी-२०त ४६ धावांची क्लासिक खेळी केली आणि त्यामुळे त्याने फलंदाजाच्या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याला मागे टाकले आहे. सूर्यकुमार ७८० रेटींग पॉईंटसह तिसऱ्या स्थानावर आला आहे आणि बाबरची ( ७७१ ) चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (  ८२५) व दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम ( ७९२) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सूर्यकुमार ऑस्ट्रेलिया व आफ्रिका ट्वेंटी-२० मालिकेत आणखी दमदार कामगिरी केल्यास अव्वल स्थान गाठू शकतो.  मोहम्मद रिझवानने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२०त ६८ धावांची खेळी केली. या क्रमवारीत टॉप टेनमध्ये सूर्या हे एकमेव भारतीय आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार्दिकने ३० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७१ धावा केल्या आणि ट्वेंटी-२०त अष्टपैलू खेळाडूंमध्ये तो दोन स्थानांच्या सुधारणेसह पाचव्या क्रमांकावर आला आहे. फलंदाजांमध्ये त्याने २२ स्थानांची सुधारणा करताना ६५ वे स्थान पटकावले आहे. या सामन्यात अक्षर पटेलने ( ३-१७) चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे तो २४व्या स्थानांच्या सुधारणेसह ३३ व्या क्रमांकावर आला.  भुवनेश्वर कुमारची ( २ स्थान खाली) नवव्या आणि युजवेंद्र चहलची ( १) २८व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. जॉश हेझलवूडने गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे.    

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवआयसीसीबाबर आजमहार्दिक पांड्या
Open in App