सूर्यकुमार यादवने इतिहास रचला; विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम, ICC कडून विशेष कौतुक 

भारतीय संघाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्या फॉर्मची साऱ्याच प्रतिस्पर्धींनी धास्ती घेतलेली पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:32 PM2023-01-11T12:32:19+5:302023-01-11T12:33:06+5:30

whatsapp join usJoin us
Suryakumar Yadav created history after his hundred vs Sri Lanka, he became a highest rating points Indian players in T20I | सूर्यकुमार यादवने इतिहास रचला; विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम, ICC कडून विशेष कौतुक 

सूर्यकुमार यादवने इतिहास रचला; विराट, रोहित यांनाही जमला नाही असा पराक्रम, ICC कडून विशेष कौतुक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्या फॉर्मची साऱ्याच प्रतिस्पर्धींनी धास्ती घेतलेली पाहायला मिळाली. नवा Mr 360 म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सूर्यकुमारने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू धू धुतले. त्याच्या ५१ चेंडूंवरील ११२ धावांच्या खेळीने भारताला ट्वेंटी-२० मालिकेत २-१ असा विजय मिळवून दिला आणि या शतकी खेळीनंतर त्याने मोठा पराक्रम नोंदवला आहे. आयसीसीच्या जागतिक ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत सूर्यकुमार यादव नंबर वन आहे. शनिवारी त्याने राजकोट येथे ४५ चेंडूंत ट्वेंटी-२०तील त्याचे तिसरे शतक पूर्ण केले. भारताने हा सामना ९७ धावांनी जिंकला होता.

४९ चौकार, ४ षटकार! पृथ्वी शॉची ऐतिहासिक खेळी; ३२ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम, लोकेशलाही टाकले मागे


सूर्याने ७ चौकार आणि ९ षटकारांसह ११२ धावा केल्या. सूर्याचे हे मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमधील तिसरे शतक होते तर भारतीय मैदानावरील पहिले शतक. जुलै २०२२ इंग्लंडविरुद्ध आणि नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्धचा शतकांसह गेल्या ६ महिन्यांत सूर्याने ३ शतके झळकावली आहेत. सूर्यकुमार यादवने २०२१ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सूर्याने आतापर्यंत १६ वन डे आणि ४५  ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. सूर्याने या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ४६.४१ च्या सरासरीने १५७८ धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतकं आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-२०मध्ये त्याचा स्ट्राईक रेट १८० पेक्षा जास्त आहे.

ट्वेंटी-२० सामन्यातील त्याच्या खेळीने सूर्यकुमार आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत मोठा विक्रम नोंदवला आहे. आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत ९००+ रेटिंग पॉईंट कमावणारा तो तिसरा फलंदाज ठरला. या शतकापूर्वी तो ८८३ पॉईंटसह अव्वल स्थानावर होता. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत त्याचे रेटिंग पॉईंट्स ९०८ इतके झाले आहेत. ट्वेंटी-२० क्रमवारीच्या इतिहासात इंग्लंडचा डेवीड मलान व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंच यांनाच ९०० पॉईंट्स कमावता आले आहेत. सूर्या जगातिल तिसरा तर पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीने ८९७ पर्यंत व लोकेश राहुलने ८५४ पर्यंत रेटिंग पॉईंट्स मिळवले होते.  

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Suryakumar Yadav created history after his hundred vs Sri Lanka, he became a highest rating points Indian players in T20I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.