Join us  

IND vs NZ: तिसऱ्या वनडेत 'सूर्या'ला विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी; रोहित शर्माचा मोडणार रेकॉर्ड

न्यूझीलंडच्या धरतीवर भारतीय संघ वनडे मालिका खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 4:31 PM

Open in App

नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या धरतीवर भारतीय संघ वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. किवी संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ तिसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा जोरदार प्रयत्न करेल. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला आणखी एक विश्वविक्रम करण्याची सुवर्णसंधी असणार आहे. 

तिसऱ्या वनडे सामन्यात सूर्यकुमार यादवने 5 षटकार ठोकले तर तो रोहित शर्माचा एक खास विक्रम मोडेल. खरं तर एका कॅलेंडर वर्षात (सर्व फॉरमॅट) सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. हिटमॅनने 2019 मध्ये एकूण 78 षटकार मारले होते. त्याचबरोबर सूर्यकुमारने या वर्षात आतापर्यंत 74 षटकार मारले असून रोहितचा विक्रम मोडण्यासाठी त्याला फक्त 5 षटकारांची गरज आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्माचा दबदबा कायम आहे. त्याने 2019 मध्ये 78, 2018 मध्ये 74 आणि 2017 मध्ये 65 षटकार मारले. त्याचबरोबर एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये एकूण 63 षटकार ठोकले होते. 

सूर्याने दुसऱ्या वनडेत ठोकले 3 षटकार न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्याची बॅट शांत राहिली आणि तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला. पावसामुळे रद्द झालेल्या दुसऱ्या वनडेत पावसाच्या बॅटिंगमुळे सामना रद्द करावा लागला. पावसामुळे केवळ 12.5 षटके खेळली गेली, ज्यामध्ये भारताने एक बळी गमावून 89 धावा केल्या. 25 चेंडूत 34 धावा केल्यानंतर सूर्यकुमार यादव नाबाद राहिला. या छोट्या खेळीत त्याने 3 षटकार मारले. लक्षणीय बाब म्हणजे सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्यासोबतच त्याने आणखी अनेक यश संपादन केले आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडसूर्यकुमार अशोक यादवरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App