Join us  

Suryakumar Yadav, IND vs SL 3rd T20: सूर्यकुमार, गिल, राहुलच्या तडाख्यापुढे श्रीलंकन गोलंदाज ठरले 'फेल'!

सूर्यकुमार यादवच्या ११२ धावा, शुबमन गिल-राहुल त्रिपाठीही चमकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 9:03 PM

Open in App

Suryakumar Yadav Rahul Tripathi, IND vs SL 2nd T20: श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने २० षटकांत २२८ धावांपर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादवचे झंझावाती शतक (नाबाद ११२) आणि शुबमन गिल (४४), राहुल त्रिपाठी (३५ धावा) यांच्या छोट्या पण उपयुक्त खेळी यांच्या जोरावर भारताने श्रीलंकेला निर्णायक सामन्यात २२९ धावांचे मोठे आव्हान दिले. भारतीय संघाने गेल्या सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर संघात एकही बदल केला नाही. पण श्रीलंकेने मात्र फलंदाजीत एक बदल केला. पण तसे असले तरी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चाहत्यांना नाराज केले. मदुशंका आणि करूणरत्ने दोघांनी चार षटकाच ५० पेक्षा जास्त धावा दिल्या तर तिक्षणानेदेखील ४८ धावा खर्च केल्या.

सामन्यात नाणेफेक जिंकताच हार्दिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. इशान किशन पहिल्याच षटकात बाद झाला. पण त्यानंतर राहुल त्रिपाठीने मात्र हार्दिकचा निर्णय योग्य ठरवला. नवख्या राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत तुफानी ३५ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने दमदार खेळीला सुरूवात केली. शुबमन गिलच्या साथीने त्याने अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतरही तो फटकेबाजी करतच राहिला. शुबमन गिल अर्धशतकाच्या जवळ पोहोचला पण त्याला ४४ धावांवर हसरंगाने माघारी धाडले.

त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या मोठा फटका मारताना ४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ दीपक हु़ड्डादेखील ४ धावांवरच बाद झाला. हे दोघेही स्वस्तात बाद झाले पण सूर्यकुमारने मात्र फटकेबाजी बंद केली नाही. त्याने वाऱ्याच्या वेगाने बॅट फिकवत आपले तिसरे आणि भारतीय फलंदाजाकडून यंदाच्या वर्षातील पहिले टी२० शतक ठोकले. त्याने ४५ चेंडूत १०० धावा केल्या. अक्षर पटेलनेही चांगली फटकेबाजी केली. त्याने ९ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद २१ धावा कुटल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादवने नाबाद ११२ धावा करत संघाला २२८ धावांची मजल मारून दिली. सूर्याने ७ चौकार आणि ९ षटकार खेचले.

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवशुभमन गिलहार्दिक पांड्या
Open in App