टीम इंडियाचा सुपरस्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या जोरदार फॉर्मवर आहे. टी 20 स्पर्धेत त्याने जोरदार फलंदाजी केली. रविवारीही झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सूर्य कुमार यादवने स्फोटक खेळी केली. त्याने या सामन्यात २५ चेंडूत ६१ धावा केल्या. या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार ठोकले. सूर्यकुमार यादवची कमाईही जोरदार आहे. ८० हजार रुपयांपासून झालेली त्याची कमाई आज काही कोटींपर्यंत पोहोचली आहे. जाणून घेऊया सूर्यकुमारची आतापर्यंतची कमाई.
सूर्यकुमार यादवने आपल्या करिअरची सुरुवात आयपीएलमधून केली होती. सुरुवातीला त्याला फक्त १० लाख रुपये मिळायचे. जे आता २०२२ मध्ये ८ कोटी रुपये झाले आहे, सध्या तो मुंबई इंडियन्स मध्ये खेळतो. २०१३ पर्यंत सूर्यकुमारचे आयपीएलमधून उत्पन्न फक्त १० लाख रुपये होते. जे दरमहा सुमारे ८० हजार रुपये आहे. पण सध्याच्या कमाईचा हिशोब काढला तर सूर्यकुमार यादव यांची एकूण संपत्ती ४ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ३२ कोटी रुपये आहे.
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानकडून नंबर स्थान हिसकावले; Shahid Afridi म्हणतो...
सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) महिन्याचे उत्पन्न हे ७०-८० लाख रुपये आहे. तर वार्षिक सुमारे ८ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. सध्या T20 मध्ये त्याचा फॉर्म जोरदार आहे. त्यामुळे त्याच्या कमाईत वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सूर्यकुमार हा लोकप्रिय भारतीय फॅन्टसी स्पोर्ट्स अॅप्स फ्री हिट अँड ड्रीम ११ चे ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहेत. तो मॅक्सिमा घड्याळे, सरीन स्पोर्ट्स, नीमन शूज, झेब्रॉनिक्स, गोनोइस आणि इतर अनेक ब्रँड्सचा प्रचार करतो, ज्यातून तो भरपूर कमाई करतो. सूर्यकुमार यादव याचे घर मुंबईत आहे. तो मुंबईतील चेंबूर येथील अणुशक्तीनगर येथील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो. त्यांच्या पत्नीचे नाव देविशा शेट्टी आहे.
सूर्यकुमार यादव जवळ लग्जरी कार सुद्धा आहेत. नुकतीच त्याने Mercedes-Benz GLE Coupe खरेदी केली. याची किंमत सुमारे २.१५ कोटी रुपये आहे.
त्याच्याकडे १५ लाख रुपये किंमतीची निसान जोंगा , ९० लाखांची रेंज रोव्हर वेलार, तसेच ६० लाखांची मिनी कूपर एस सारख्या कारचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवला कारशिवाय स्पोर्ट्स बाइक्सचाही शौक आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याच्याकडे सुझुकी हायाबुसा आणि हार्ले-डेव्हिडसन सारख्या महागड्या बाइक्सही आहेत.